एरंडोल : २००८ ते २०१८ या दहा वर्षाच्या काळात अंजनी नदीचे जलाशय जानेवारी २०१९ या महिन्यात कोरडे होणार आहे, अशी माहिती गिरणा पाटबंधारे विभागाने दिली आहे. १० वर्षांत पहिल्यांदा अंजनीच्या जलाशयाने तळ गाठला आहे.२००८ मध्ये प्रथमच अंजनी धरणात जलसाठा निर्मिती झाली. पहिल्या वर्षी जलाशय १०० टक्के पाण्याने भरले होते. २००९ ते २०११ पर्यंत हे चित्र कायम राहिले. मात्र २०१२ पासून पाणी साठ्यात कमी कमी वाढ झाली.२०१७ च्या पावसाळ्यात जेमतेम ४.७३ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यापेक्षा विदारक स्थिती या वर्षी निर्माण झाली. जवळपास वर्षभरापासून अंजनीत मृतसाठा आहे. एरंडोल शहराला या मृत साठ्यातून पाणी पुरवठा अजूनही सुरू आहे. मात्र सदर पाणी जानेवारी २०१९ च्या मध्यापर्यंत पुरेल. त्यानंतरच्या काळात पालिकेने पर्यायी व्यवस्था उभारावी असे गिरणा पाटबंधारे विभागाने नगरपालिकेस कळविले आहे.शेतबांध, नाला बांध, सिमेंट बंधारे, नाला खोलीकरण इत्यादी जलसंधारणाची कामे अंजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे पाण्याची आवक कमी झाली.यावर्षी पर्जन्यमान कमी झाले. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चुनही अंजनी धरणापासून शेती सिंचन तर दूरच पण पिण्याच्या पाण्याचा लाभ होणार नाही. त्यामुळे एरंडोल व पंचक्रोशीतील गावांना २०१९ मधील उन्हाळा आधीच भीषण पाणी टंचाई भासणार आहे.
‘अंजनी’चे जलाशय कोरडे होण्याची चिन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 9:56 PM
२००८ ते २०१८ या दहा वर्षाच्या काळात अंजनी नदीचे जलाशय जानेवारी २०१९ या महिन्यात कोरडे होणार आहे, अशी माहिती गिरणा पाटबंधारे विभागाने दिली आहे.
ठळक मुद्देगेल्या दहा वर्षानंतर पहिल्यांदाच निर्माण झाली परिस्थिती२००८ मध्ये प्रथमच अंजनी धरण पूर्ण भरला होतायावर्षी एरंडोलकरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार