जळगाव : अमेरिका व इराणमधील तणावामुळे सोने-चांदीच्या भावात वाढ सुरूच असून चांदीचे भाव ४९ हजार ५०० रुपये प्रती किलोवर पोहचले आहे. सोनेदेखील दोन दिवसांनंतर पुन्हा ४१ हजार ४०० रुपये प्रती तोळ््यावर पोहचले आहेत. हे भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.अमेरिका व इराण यांच्या तणावाच्या स्थितीमुळे गेल्या चार दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ होत आहे. बुधवारी चांदीच्या भावात पुन्हा ५०० रुपये प्रती किलोने वाढ होऊन ती ४९ हजार ५०० रुपयांवर पोहचली आहे.४ दिवसात सोने १८०० रुपयांनी वधारलेगेल्या दोन महिन्यांपासून सोने ३८ ते ३९ हजार रुपये प्रती तोळ््यावर कमी-जास्त होत राहिले. २ रोजी ३९ हजार ६०० रुपये प्रती तोळा असलेल्या सोन्याच्या भावात अमेरिका व इराण यांच्यातील तणावामुळे चारच दिवसात थेट एक हजार ८०० रुपये प्रती तोळ््याने वाढ होऊन सोमवार, ६ जानेवारी रोजी ते ४१ हजार ४०० रुपये प्रती तोळा झाले. त्यात मंगळवार, ७ जानेवारी रोजी ५५० रुपये प्रती तोळ््याने घसरण होऊन ते ४० हजार ८५० रुपयांवर आले होते. मात्र दोन्ही देशातील तणाव कमी होत नसल्याने बुधवारी पुन्हा त्यात ५५० रुपये प्रती तोळ््याने वाढ होऊन सोने पुन्हा ४१ हजार ४०० रुपये प्रती तोळ््यावर पोहचले.चांदीच्या भावात अडीच हजार रुपयांनी वाढ२ रोजी ४७ हजार रुपये प्रती किलोवर असलेल्या चांदीचे भाव ४ रोजी ४८ हजार रुपये व सोमवार, ६ रोजी त्यात पुन्हा एक हजार रुपये प्रती किलोने वाढ होऊन ती ४९ हजार रुपये प्रती किलो झाली. मंगळवार, ७ रोजी त्याच भावावर स्थिर असलेल्या चांदीच्या भावात बुधवार, ८ रोजी पुन्हा ५०० रुपये प्रती किलोने वाढ होऊन ती ४९ हजार ५०० रुपये प्रती किलो झाली. हळूहळू वाढ होऊन चांदी ५० हजाराच्या दिशेने जात असून एक-दोन दिवसात ती ‘पन्नाशी’ गाठणार असल्याचे संकेत सुवर्ण बाजारातून दिले जात आहे.अमेरिका व इराणमधील तणावामुळे सोने-चांदीच्या भावात वाढ सुरूच असून बुधवारी सोने-चांदीच्या भावात पुन्हा वाढ झाली.-स्वरुप लुंकड, सचिव, जळगाव शहर सराफ असोसिएशन, जळगाव.
चांदी ५० हजाराच्या दिशेने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2020 1:04 PM