जळगाव: गेल्या आठवड्यापासून ८९ हजार रुपयांच्या आत असलेल्या चांदीच्या भावात बुधवारी (३ जुलै) एक हजार २०० रुपयांची वाढ होऊन ती थेट ९० हजार रुपये प्रति किलोवर पोहचली. सोन्याच्याही भावात ४०० रुपयांची वाढ होऊन ते ७२ हजार ७०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले.
मे महिन्यात ९४ हजार रुपये अशा उच्चांकी भावावर पोहचलेले चांदीचे भाव जून महिन्यात कमी झाले. त्यात २४ जूनपासून चांदी ९० हजारांच्या आत आली २७ जून रोजी तर ती ८८ हजार रुपये प्रति किलोवर आली होती. त्यानंतर थोडीफार वाढ होत जाऊन २ जुलैपर्यंत ती ८८ हजार ८०० रुपयांवर पोहचली. ३ जुलै रोजी तर एकाच दिवसात थेट एक हजार २०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी ९० हजार रुपये प्रति किलोवर पोहचली.
या सोबतच सोन्याच्या भावातही ४०० रुपयांची वाढ झाल्याने सोने ७२ हजार ३०० रुपयांवरून ७२ हजार ७०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले.