शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

अधिक मासात मागणी वाढल्याने चांदीला चकाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:38 PM

सोने घसरले

ठळक मुद्देविदेशातून चांदीची आवक घटलीएकाच दिवसात थेट ५०० रुपये प्रति किलोने वाढ

विजयकुमार सैतवाल / आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २३ - अधिक मासामुळे चांदीला मागणी वाढल्याने चांदीच्या भावात एकाच दिवसात प्रति किलो ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. शनिवारी सुवर्ण बाजार बंद झाला त्या वेळी ४१ हजार रुपये प्रति किलो असलेली चांदी सोमवारी ४१ हजार ५०० रुपयांवर पोहचली तर मंगळवारीदेखील हेच भाव स्थिर राहिले.दरम्यान, अमेरिकेने सोन्यातील गुंतवणूक कमी केल्याने सोन्याचे भाव आठवडाभरापासून घसरतच असून सोन्याचे भाव प्रति तोळा ५०० रुपयांनी घसरुन मंगळवारी ते ३१ हजार ४०० रुपयांवर आले.दोन महिन्यात अडीच हजार रुपयांनी वाढभारतात ब्राझील, लंडन येथून चांदीची आवक होत असते. गेल्या काही महिन्यांपासून चांदीची आवक घटली असून त्यामुळे भावात सातत्याने वाढ होत आहे. मार्च महिन्यात ३९ हजार रुपये प्रति किलो असलेल्या चांदीच्या भावात वाढ होत जाऊन मार्च अखेर ती ३९ हजार ५०० रुपयांवर आली. त्यानंतरही वाढ कायम राहत एप्रिल महिन्यात अक्षय्यतृतीयेपूर्वीच चांदी ४० हजारावर पोहचली व त्यानंतर एप्रिल अखेर ४१ हजाराचा टप्पा चांदीने गाठला. मे महिन्यातही ४१ हजारावर असलेल्या चांदीच्या भावात २१ मे रोजी थेट ५०० रुपयांनी वाढ होऊन दोन महिन्यात अडीच हजार रुपये प्रति किलोने चांदीचे भाव वधारले आहे.अधिक मासामुळे वाढली मागणीएकतर आवक कमी असल्याने भाव वाढत असताना अधिक मासात चांदीची मागणी वाढली आहे. तीन वर्षातून एकदा येणाऱ्या अधिक मासामध्ये तांब्याच्या भांड्यासह चांदीचेही भाडे देण्याची प्रथा आहे. त्यानुसार यंदाही चांदीची मागणी वाढली आहे. नेहमीपेक्षा चांदीची विक्री साधारणपणे ३० टक्क्याने वाढली असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे एकाच दिवसात थेट ५०० रुपये प्रति किलोने वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.सोन्यात घसरणगेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने वाढ होत असलेल्या सोन्याच्या भावात मात्र आता सतत घसरण होत आहे. अमेरिकेने सोन्यातील गुंतवणूक थांबवून ती शेअर मार्केटकडे वळविल्याने सोन्याचे भाव घसरत आहे. या सोबतच अमेरिकन संसदेने करांसंदर्भात निर्णय घेतल्याने त्याचाही परिणाम सोन्यावर होऊन भारतीय बाजारपेठेवरही त्याचे परिणाम जाणवत आहे. त्यामुळे १४ मे रोजी ३१ हजार ९०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात घसरण होत जावून ते ३१हजार ४०० रुपये प्रति तोळ््यावर आले आहे.चांदीची आवक घटल्याने भावात वाढ होत आहे. आता अधिक मासामुळे चांदीला मागणी वाढली आहे. त्यामुळे भाव वाढीत भर पडत आहे. सोन्याच्या भावात गेल्या आठवड्यापासून १०० ते १५० रुपयांनी घसरण होत आहे.- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन.

टॅग्स :GoldसोनंJalgaonजळगाव