लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : चांदीच्या भावात घसरण सुरूच असून शनिवारी (९ नोव्हेंबर) पुन्हा एक हजार रुपयांची घसरण होऊन चांदी ९२ हजार रुपये प्रति किलोवर आली. सोने भावातही १०० रुपयांची घसरण होऊन ते ७८ हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर आले. गेल्या महिन्यात झपाट्याने वाढ होत गेलेल्या चांदीच्या भावात गेल्या चार दिवसांपासून घसरण सुरू आहे. ५ नोव्हेंबर रोजी ९६ हजारांवर असलेल्या चांदीच्या भावात ६ रोजी दोन हजार रुपयांची घसरण होऊन ती ९४ हजारांवर आली होती. त्यानंतर ७ रोजी पुन्हा एक हजार रुपयांची घसरण झाली. ८ रोजी ९३ हजारांवर स्थिर राहिल्यानंतर ९ नोव्हेंबरला त्यात एक हजार रुपयांची घसरण झाली व चांदी ९२ हजार रुपये प्रति किलोवर आली.
३१ ऑक्टोबरपासून घसरण सुरूचचांदीच्या भावातील घसरण पाहिली तर नऊ दिवसात चांदीमध्ये सात हजार रुपयांची घसरण झाली आहे. ३१ ऑक्टोबर रोजी चांदी ९९ हजारांवर होती. नोव्हेंबर महिना सुरू झाल्यानंतर घसरणही सुरू झाली. आतापर्यंत चांदी सात हजारांनी गडगडली.