वासेफ पटेलभुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील साकेगाव, जोगलखेडा, भानखेडा, साकरी, किन्ही, गोंभी या परिसरात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वाळू तस्करांची चांदी झाली आहे. दररोज शेकडो ब्रास वाळू, माती व डबरचे उत्खनन राजरोसपणे सुरू असून, २० फूट खोलवर उत्खनन करण्यात आले आहे. यामुळे पर्यावरणाचा ºहास होत असून, यावर गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. पर्यावरणप्रेमींनी याविषयी उपमुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी म्हणून मेल केला आहे.साकेगाव शिवारात जोगलखेडा, भानखेडा याठिकाणी बिना लिलाव हम ठेकेदार अशी गत झाली आहे. दररोज ४० ते ५० डंपर व ट्रॅक्टर वाळू, माती डबरचा पाहिजे त्या ठिकाणी उत्खनन करून राजरोसपणे शेकडो ब्रासची तस्करी करीत आहे. गावाच्या चारी बाजूला वाळू तस्करांनी जमिनीत २०-२५ फुटांपर्यंत खोल उत्खनन करून गौणखनिज पळविणे सुरू केले आहे. हीच परिस्थिती तालुक्यातील साकरी, किन्ही, गोंभी या परिसराची आहे. याठिकाणी अत्याधुनिक यंत्राद्वारे गौण खनिजाचा उपसा सातत्याने सुरूच आहे.दर १० मिनिटाने पास होते गौणखनिजाचे वाहनजोगलखेडा, भानखेडा तसेच साकेगाव रेल्वे पुलाजवळ वाळूचा उपसा सातत्याने सुरू आहे. दर १० मिनिटाला वाळूने भरलेल्या एका वाहनाची तस्करी होत आहे. यापोटी प्रशासनाचा कोट्यवधींचा महसूल कोणाच्या आशिर्वादाने बुडत आहे हा एक संशोधनाचा विषय आहे.मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर अशी होते कारवाईपर्यावरणप्रेमींकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘सेटींग’ असल्यामुळे जास्तच गवगवा झाल्यास एखादी गाडी पकडून त्यांच्यावर कारवाईचा देखावा करण्यात येतो. मी मारल्यासारखा करीन तू रडल्यासारखा कर अशा पद्धतीची कारवाई करण्यात येते.अजित पवार यांनी दखल घ्यावी यासाठी मेलभुसावळ शहरासह तालुक्यात खुलेआम सुरू असलेला गौणखनिजाचा गंभीर प्रश्न व यामुळे होणारा पर्यावरणाचा ºहास ही गंभीर बाब आहे. याची थेट दखल उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावी याकरिता पर्यावरणप्रेमींनी त्यांना मेलद्वारे तालुक्यातील गौणखनिजाची झालेल्या परिस्थितीबद्दल माहिती दिली आहे.वाळू तस्करांना आधी मिळून जाते सूचनातहसील कार्यालयापासून तर थेट गौणखनिजाच्या अड्ड्यापर्यंत अगदी ५०० मीटर अंतरावर माणसांची नेमणूक करण्यात आली आहे. कोण व्यक्ती तहसील कार्यालयातून निघत आहे, कोणत्या गाडीत येत आहे याचे संदेश व माहिती त्वरित पुढे फॉरवर्ड केली जाते. ही माहिती कोण देतो हा संशोधनाचा विषय आहे. याची सखोल चौकशी व्हावी, असाही सूर उमटत आहे.रात्रीतून गायब झाला ५० डंपरचा ठिय्याजोगलखेडा, भानखेडा परिसरात रस्त्याच्या कडेला असलेला ५० डंपरचा वाळू बेनामी वाळूचा ठिय्या महसूल खात्याला माहिती मिळताच दुसऱ्या दिवशी सकाळी गायब झाला.दरम्यान, साकेगावचे तलाठी हेमंत महाजन यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली. तसेच १०-१२ ठिकाणी बेनामी असलेले वाळूच्या ठिय्यांचा लिलाव करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, याबाबत प्रांत रामसिंग सुलाने तहसीलदार व दीपक धिवरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.
कोरोना महामारीत वाळूमाफियांची चांदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 4:21 PM
साकेगाव परिसरात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वाळू तस्करांची चांदी झाली आहे.
ठळक मुद्दे२० फूट खोल उत्खनन करून वाळू, डबर, मातीची तस्करीदिवसभरात शेकडो ब्रासचा उपसापर्यावरण प्रेमींचा उपमुख्यमंत्र्यांना मेल पर्यावरणाचा ºहास