जळगाव : चांदीच्या भावात घसरण सुरूच असून बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी चांदी पुन्हा एक हजार रुपयांनी घसरून ४० हजार रुपयांवरून ३९ हजार रुपये प्रती किलोवर आली. दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयामध्ये घसरण होऊन सोन्याचे भाव ५०० रुपयांनी वाढून ते ४१ हजार ६०० रुपयांवर पोहचले आहेत.कोरोनाच्या परिणामामुळे सोने-चांदीची आयात-निर्यात थांबल्याने त्यांचे भाव घसरत आहे. यात औद्योगिक मागणी कमीच होत असल्याने बुधवारी चांदीच्या भावात एक हजार रुपयांनी घसरण झाली. त्यामुळे मंगळवारी ४० हजार रुपयांवर असलेल्या चांदीचे भाव ३९ हजार रुपये प्रती किलोवर आले. मंगळवारी चांदीमध्ये अडीच हजार रुपये प्रती किलोने घसरण झाली होती.चांदीचे भाव कमी होत असले तरी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयामध्ये घसरण होऊन डॉलरचे भाव ७४.२५ रुपयांवर पोहचल्याने सोन्याच्या भावात बुधवारी ५०० रुपये प्रती तोळ््याने वाढ झाली. त्यामुळे सोने ४१ हजार १०० रुपयांवरून ४१ हजार ६०० रुपये प्रती तोळ््यावर पोहचले आहेत,जागतिक पातळीवर चांदीची औद्योगिक मागणी कमी झाल्याने चांदीच्या भावात घसरण होत आहे.- स्वरुप लुंकड, सचिव, जळगाव शहर सराफ असोसिएशन, जळगाव.
चांदी एक हजार रुपयांनी गडगडली, ३९ हजारावर भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 12:17 PM