सोने चाळीस हजारीप्रत्येक भारतीयांचे खास आकर्षण असणाऱ्या सोन्याने यंदा आतापर्यंतची सर्वात मोठी उच्चांकी गाठली. अमेरिका व चीनने सोने-चांदीची खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यासह भारतीय रुपयात होत घसरण तसेच वायदे बाजारात दररोज वाढीव भाव निघू लागल्याने सोन्याचे भाव वाढतच गेले. विशेष म्हणजे आॅगस्टपासून मागणी कमी होत जाणाºया सोन्या-चांदीच्या भावात नेमकी त्याच काळात तेजी सुरू झाली. चढ-उतार सुरुच राहून वर्षअखेरपर्यंत सोने ३९ हजाराच्या जवळपास आहे.सणोत्सवात मंदीतून सावरला बाजारयंदा सर्वच क्षेत्रात मंदीचे वातावरण असल्याने प्रत्येक जण चिंतीत राहिली. मात्र गणेशोत्सावापासून बाजारपेठेत चैतन्य येऊन बांधकाम क्षेत्रासह वाहन, इलेक्ट्रॉनिक्स बाजारात उत्साह आला.कांदा ताटातून गायबकांद्याच्या भावाने यंदा सर्वांचेच गणित चुकविले. पावसाळ््यापासूनच कांद्याचे भाव वाढत जाऊन ते शंभरीपर्यंत पोहचले. वर्ष संपत आले तरी कांदा अद्यापही ‘भाव’ खातच असून उन्हाळी कांदा येईपर्यंत कांद्याचे भाव चढेच राहणार असल्याचे संकेत आहे. कांद्याचे भाव वाढल्याने कांदा ताटातून गायब होऊन त्यांची जागा इतर फळ-भाज्यांनी घेतली.कॉर्पोरेट टॅक्स झाला कमीकेंद्र सरकारने कार्पोरेट टॅक्स कमी केला तरी सोने-चांदीचे भाव कमी न होता केवळ सुवर्ण आभूषणे तयार करणाºया उत्पादकांना त्याचा लाभ झाला. वर्ष अखेर आयकर भरताना त्यावर लागणाºया कार्पोरेट टॅक्समध्ये ही कपात करण्यात आल्याने त्याचा लाभ व्यावसायिकांना होणार आहे.निवडणुकीमुळे इंधनाचा दिलासालोकसभा निवडणुकीमुळे इंधनाचे दर स्थिर ठेवत अथवा कमी-कमी करीत ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारकडून झाला. डिझेल ६९.१५ रुपयांवर तर पेट्रोलही प्रती लीटर ८० रुपयांच्या खाली आले होते.कडधान्याच्या आयातीवर निर्बंधडाळ निर्मितीसाठी विदेशातून आयात होणाºया उडीद, मूग, तूर, वटाणे या कच्च्या मालाच्या आयातीच्या प्रमाणावर केंद्र सरकारने निर्बंध घातले. यामुळे देशातील शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला. तसेच दालमिलच्या उत्पादनावर परिणाम झाला नसला तरी ग्राहकांच्या खिशाला झळ बसली.अगरबत्तींच्या आयातीवर निर्बंधविदेशातूनअगरबत्ती व सुगंधीत घटक पदार्थांची आवक वाढून स्थानिक रोजगारावर परिणाम होऊ लागल्याने केंद्र सरकारने अगरबत्ती व सुगंधीत घटक पदार्थांच्या आयातीवर निर्बंध घातले.४० टक्के बांधकाम सक्तीउद्योगासाठी असलेल्या एकूण जागेपैकी ४० टक्के जागेवर बांधकाम करण्याची सक्ती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) केल्याने त्याचा मोठा फटका लघू व मध्यम उद्योजक चिंतीत झाले.उद्योगांच्या सेवा शुल्काने वाढविली चिंताआधीच मंदीच्या झळा सोसणाºया तसेच वीज दरवाढ व इतर करांच्या बोझाखाली असलेल्या उद्योगांच्या सेवा शुल्कात साडे चार रुपये प्रती चौरस मीटरवरून थेट १३ रुपये प्रती चौरस मीटर (प्रती वर्ष) अशी भरमसाठ वाढ करण्यात आल्याने उद्योजक संतप्त झाले. जळगावातील उद्योजकांनी या विषयी थेट उद्योग मंत्र्यांकडे तक्रार केल्याने सध्या या सेवा शुल्क वाढीस स्थगिती देण्यात आली. मात्र अद्याप निर्णय रद्द न झाल्याने त्या विरुद्ध उद्योजक आक्रमक आहेत.- संकलन- विजयकुमार सैतवाल
गुडबाय २०१९ : मंदीतही ‘चांदी’..... सोन्याची नवी उच्चांकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 12:33 PM