ऑनलाईन लोकमत एरंडोल (जि. जळगाव), दि.21 : तालुक्यातील गालापूर येथील भिल्ल वस्तीत असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पोळ्यानिमित्त अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या शाळेचे मुख्याध्यापक तथा उपक्रमशील शिक्षक किशोर पाटील कुंझरकर गेल्या 17 वर्षापासून दरवर्षी बैलपोळा सणानिमित्त बैलांवर ‘बेटी बचाव बेढी पढाव’ आदी संदेश लिहिण्याचा अभिनव उपक्रम राबवून पोळा सणाला जनजागृती करीत आहेत. त्यांचा हा जनजागृतीचा प्रयत्न सर्वत्र अनुकरणीय ठरला आहे. किशोर पाटील हे गावागावात पोळा सणानिमित्त बैलांच्या पाठीवर ‘बेटी बचाव’, ‘पाणी अडवा पाणी वाचवा’, ‘शौचालयाचा वापर करा’, ‘शेतक:यांनी आत्महत्या करू नका’ अशी विविध प्रकारची घोषवाक्ये स्वत: हस्ताक्षरात लिहून जनजागृती करतात. यंदा व्हॉटसअॅप ग्रुपद्वारे सर्वत्र ह्या उपक्रमांना प्रोत्साहन मिळत असून, शिक्षकाची जबाबदारी सांभाळत असताना त्यांनी समाज बांधिलकी म्हणून दरवर्षी हा उपक्रम राबवितात.
भिल्लवस्ती शाळेतील शिक्षकाचा असाही उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 1:20 AM
बेटी बचाव बेटी पढावसह विविध जनजागृतीपर उपक्रमांमध्ये सातत्याने सहभाग घेण्यात येत आहे.
ठळक मुद्देगालापूर येथे जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकाचा पुढाकार17 वर्षापासून राबविण्यात येत आहे अभिनव उपक्रमउपक्रमाची सोशल मीडियावर होतेय चर्चा