विद्यार्थ्यांचा समग्र व सर्वांगीण विकास होण्यासाठी गुण महत्त्वाचे नसून गुणवत्तापूर्ण ज्ञान महत्त्वाचे आहे़ कोणत्याही विषयाचे ज्ञान अवगत झाले, म्हणजे आपोआप गुणात्मक वाढ होते़ महाराष्ट्र राज्य बोर्डाने विज्ञान व गणित या विषयांत अंतर्गत गुणदान पद्धती सुरू ठेवलेली आहे़ ती मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषा विषयांसाठीच रद्द केली आहे़ हे अव्यवहार्य वाटते़ कारण, भाषेचे मूल्यमापन केवळ लेखी परीक्षेतून करता येणे शक्य नाही़ भाषेचे प्रत्यक्ष व्यवहारात उपयोजन करता आले पाहिजे. कोणत्याही भाषेचे सौंदर्य हे तिच्या प्रकटीकरणावर अवलंबून असते़ एखाद्या विद्यार्थ्याने भाषा विषयाच्या लेखी परीक्षेत १०० पैकी १०० गुण मिळवले. मात्र, व्यवहारात किंवा वक्तृत्व स्पर्धेत त्यास जर शुद्ध बोलता येत नसेल तर मिळालेले गुण अर्थशून्य आहेत़ म्हणूनच भाषा विषयांचे मूल्यमापन हे कौशल्याधिष्ठित असते. तसेच तेस तोंडी व लेखी परीक्षेद्वारेसुद्धा व्हायला हवे. अंतर्गत गुण देतांना शाळेने तसेच विषय शिक्षकांनी कोणतेही हितसंबंध, प्रलोभन अथवा गुण-वाढ यांचा विचार करू नये़ विद्यार्थ्याच्या अभ्यासाचा तसेच भाषेच्या उपयोजनाबाबत सर्वांगीण आढावा घ्यावा. त्यानंतर गुणदान करावे. यामध्ये पारदर्शकता असावी़ तोंडी परीक्षेत कितीही गुण असो, लेखी परीक्षेत मात्र एक तृतीयांश गुण असायलाच हवेत. निकालातील गुण आणि गुणवत्ता यात मात्र तफावत जाणवायला नको.-गोपाळ आनंदा बानाईतजिल्हास्तरीय इंग्रजी विषयतज्ज्ञ, वरणगाव़, ता़ भुसावऴ
निकाल व गुणवत्तेत हवी समानता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 6:53 PM