जळगाव - अ.भा.अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त कास्ट्राईब महासंघाच्या जिल्हाध्यक्ष प्रभावती बावस्कर यांचे ‘सावित्रीबाई फुले व आजची स्त्री’ या विषयावर व्याख्यान झाले. हा कार्यक्रम गुगलमिटच्या माध्यमातीन ऑनलाईन घेण्यात आला. वक्त्यांचा परिचय निशा पाटील यांनी केला. प्रास्ताविक मनीषा सूर्यवंशी, सूत्रसंचालन प्रियंका साळवे व आभार प्रदर्शन अर्चना सपकाळे यांनी केले. यशस्वीतेसाठी विनोद सपकाळे, जे.डी.ठाकरे, उगलाल शिंदे, के.आर.केदार, निंबाजी बारी, सुधीर काळवाघे, योगेश करंदीकर, सागर पाटील, महेश शिंपी यांनी परिश्रम घेतले.
महाराणा प्रताप विद्यालयाचा उपक्रम
जळगाव - दि पूर्व खान्देश हिंदी शिक्षण संस्था संचलित महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात, प्रेमनगर येथे संस्था अध्यक्षा रत्नाताई जैन यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्याध्यापिका साधना शर्मा यांच्याहस्ते खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी उपमुख्याध्यापक डी.एस.पाटील, पर्यवेक्षक डी.बी.सोनवणे, कनिष्ठ विभाग प्रमुख गजेंद्र पाटील उपस्थित होते.