जामनेर : भाजपचे नेते माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ मंगळवारी सकाळी साडेआकरा वाजेच्या सुमारास भाजप कार्यकर्त्यांनी नगरपालिका चौकात ठिय्या आंदोलन केले. सुमारे पाऊण तास पदाधिकारी व नेत्यांनी वाहतूक रोखून धरल्याने वाहन कोंडी झाली होती.
निलंबन मागे घेण्याच्या मागणीसाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते बाबाजी राघो मंगल कार्यालयात एकत्र झाले होते.
विधानसभेचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे कार्यकर्त्यांनी दहन करून राज्यपालांना पाठवण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन दिले. बारा आमदारांचे नियमबाह्य झालेले निलंबन मागे घेण्याची मागणी निवेदनात केली आहे.
आघाडी शासनाच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत कार्यकर्ते पालिका चौकात जमा झाले.
या ठिकाणी भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जि. प.चे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, गोविंद अग्रवाल, उपनगराध्यक्ष प्रा. शरद पाटील, महेंद्र बाविस्कर यांनी बारा आमदारांच्या निलंबनाचा निषेध केला. नगराध्यक्ष साधना महाजन, शेंदुर्णीच्या नगराध्यक्ष विजया खलसे, डॉ. प्रशांत भोंडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होेते.
फोटो कॅप्शन
१ आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ तालिका अध्यक्षांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करताना भाजप कार्यकर्ते.
२ भाजप आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ नगरपालिका चौकात ठिय्या आंदोलन करताना भाजप कार्यकर्ते.
060721\06jal_2_06072021_12.jpg
भाजप आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ नगरपालिका चौकत ठिय्या आंदोलन करतांना भाजप कार्यकर्ते