आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२१ : जिल्हा रुग्णालयातील कूपनलिका सुरू न केल्याने पाण्याच्या टाक्या भरल्या गेल्या नाही व त्यामुळे रुग्णालयातील पाण्याचा आधार असलेल्या पाणपोईतही पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे सकाळपासूनच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे प्रचंड हाल झाले.जिल्हा रुग्णालयात पिण्याच्या पाण्याच्या ठिकठिकाणी चार टाक्या ठेवण्यात आलेल्या आहेत. यात बहुतांश वेळा पाणी उपलब्ध नसते. त्यामुळे सेवालयानजीक असलेल्या संत बाबा गुरुदासराम चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने उभारण्यात आलेल्या पाणपोईवर दररोज रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची पाण्यासाठी गर्दी होत असते.रविवारी मात्र जिल्हा रुग्णालयातील कूपनलिका सुरू न केल्याने या पाणपाईवरील पाण्याची टाकी भरली गेली नाही. त्यामुळे सकाळपासून येथे पाणी उपलब्ध न झाल्याने मोठे हाल झाले. प्रत्येक मिनिटा-मिनिटाला रुग्ण, त्यांचे नातेवाईक पाण्यासाठी बाटल्या घेऊन येत होते. मात्र पाणी नसल्याचे पाहून त्यांना माघारी परतावे लागले.रुग्णालय परिसरातील सेवालयानजीकच्या या पाणपोईवर एक हजार लिटरची पाण्याची टाकी बसविलेली आहे. दररोज येथून पाणी नेले जात असल्याने दिवसातून ती पाच वेळा भरावी लागते. त्यामुळे येथून दररोज पाच हजार लिटर पाणी रुग्णांना उपलब्ध होते. मात्र आज बोअरिंगच सुरू न झाल्याने पाण्याचा थेंबही मिळू शकला नाही.पाणी मिळत नसल्याने अति दक्षता विभागात दाखल असलेल्या एका रुग्णाच्या नातेवाईकाने पाण्याचे जार विकत आणले. स्वत: ते पाणी पिण्यासह इतरही रुग्णांना पाण्याची मदत केली.
जिल्हा रुग्णालयात पाण्याविना रुग्ण व नातेवाईकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 3:45 PM
जिल्हा रुग्णालयातील कूपनलिका सुरू न केल्याने पाण्याच्या टाक्या भरल्या गेल्या नाही व त्यामुळे रुग्णालयातील पाण्याचा आधार असलेल्या पाणपोईतही पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे सकाळपासूनच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे प्रचंड हाल झाले.
ठळक मुद्देरुग्णांची पाण्यासाठी दिवसभर वणवणकूपनलिका सुरू न केल्याने ठणठणाटदररोज पाच हजार लिटर पाण्याचा वापररुग्णांच्या नातेवाईकांनी विकत आणले पाण्याचे जार