ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि.9 - राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रुसा) योजनेंतर्गत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला दुस:या टप्प्यासाठी सहा कोटी रुपये अनुदान मंजूर झाले आहे.
रुसा कार्यालयाकडून दुस:या टप्प्याच्या अनुदानासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. विद्यापीठाने कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाला अनुदान मिळण्यासाठी रुसा समन्वयक प्रा. पी. पी. माहुलीकर, प्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी, वित्त व लेखा अधिकारी डॉ. बी. डी. क:हाड, कार्यकारी अभियंता सी. टी. पाटील, विद्यापीठ उपअभियंता एस.आर. पाटील यांनी प्रस्ताव तयार करून राज्य प्रकल्प संचालनालय यांना सादर केला होता.