भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ रेल्वे विभागातील अत्यंत महत्त्वाच्या मॉडेल आणि अ श्रेणीतील भुसावळ रेल्वेस्थानकावर सरकते जिने उभारणीच्या (एक्सेलेटर) कामाला सुरूवात झाली आहे. दरम्यान, फलाट क्रमांक एक आणि तीनवर शेड उभारणीचे काम अंतिम टप्यात आले असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. या सर्व प्रकल्पांमुळे भुसावळ रेल्वे स्थानक हायटेक झाले आहे. या स्थानकाचा ‘लूक’ बदलला आहे. दरम्यान, प्रवाशांच्या सोयीसाठी सरकते जिने (एक्सेलेटर) उभारणीच्या कामाला सुरुवात झाली असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. भुसावळ रेल्वे स्थानकावरील सध्याच्या जुन्या पादचारी पुलाच्या उत्तर व दक्षिण या दोन्ही टोकांवर सरकते जिने बांधण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. दक्षिण भागातील पादचारी पुलाचा काही भाग तोडून त्या ठिकाणी फाउंडेशन तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.पार्सल कार्यालय हलविणारउत्तर भागात सरकता जिना तयार करण्यासाठी पुरेसी जागा आहे. मात्र दक्षिण भागात तशी स्थिती नाही.या ठिकाणी पार्सल कार्यालय आहे. ते तोडून त्या ठिकाणी जिना होईल.पार्सल कार्यालय हलविले जाईल.भुसावळ रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एक आणि तीनवर पार्सल कार्यालयापासून नागपूर एण्ड पर्यंत शेड राहील.५० बाय २० मीटरचे सीओपी (कव्हर ओव्हर प्लॅटफॉर्म) उभारणीचे काम अखेरच्या टप्यात आले आहे.त्याची उभारणी सुरू आहे.फलाट एक आणि तीनवरील सीओपीमुळे भुसावळ रेल्वे स्थानकाच्या सौंदर्यात भर पडली आहे.या ठिकाणी प्रवाशांसाठी अनेक सोयी-सुविधा करण्यात येणार आहेत.सीओपीमुळे प्रवाशांची गैरसोय टळणार आहे. त्यांना चांगली सुविधा मिळणार आहे.शेड उभारणीचे काम पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी पंखे, पाण्याची सोय, विजेची सोय, प्रवाशांना बसण्यासाठी सोय करुन दिली जाणार आहे. या मुळे भुसावळ रेल्वे स्थानकाच्या सौंदर्यात भर पडली आहे.सौंदर्य खुलले आहे.सीओपीस या ठिकाणी फलाटाचा तळदेखील आधुनिक करण्यात येणार आहे.त्यामुळे आता बोडके दिसणारे भुसावळ रेल्वे स्थानक आकर्षक दिसणार आहे.सीओपीचे काम साधारण दीड महिन्यात पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकृत सूत्रांनी दिली.सरकते जिने उभारणीला प्रारंभ भुसावळ रेल्वे स्थानकावरील जुन्या उड्डाणपुलावर दोन्ही बाजुंनी (दक्षिण-उत्तर) रेल्वेस्थानकाच्या दक्षिण भागातील पार्सल कार्यालयाजवळ पादचारी पुलावर सरकता जिना उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे.स्थानकाच्या उत्तर भागात पादचारी पुलावर रिक्षा थांब्याजवळ सरकता जिना उभारण्यासाठी कामांना लवकरच सुरुवात होणार असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.विजेवर चालणाºया या जिण्यांसाठी केवळ फाउंडेशन उभारले जाणार आहे. जिणा तयार राहील,असे सूत्रांनी सांगितले.आठ मशिनींची उभारणीरेल्वे स्थानकावर सध्या एकूण आठ फलाट आहेत. प्रत्येक फलाटावर एक या प्रमाणे आरओ पाण्याच्या आठ मशिनी आल्या आहेत.एक रुपयात पाणीसरकारी धोरणानुसार रेल्वेतून प्रवास करणाºया प्रवाशांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे यासाठी मशीन बसविण्यात आल्या आहेत.१ रुपयात एक बॉटल पाणी उपलब्ध होईल.
सरकते जिने व शेड उभारणी जोमाने
By admin | Published: February 22, 2017 12:26 AM