शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
2
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
3
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
5
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
6
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
7
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
8
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
9
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
11
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
12
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
13
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
14
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
15
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
16
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
17
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
18
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
19
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
20
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...

स्मिता वाघ की करण पवार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 11:18 AM

उमेदवारीसाठी रस्सीखेच

ठळक मुद्दे दिल्ली दरबारी दोन नावे रवाना

जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघासाठी भाजपाकडून आमदार स्मिता वाघ व पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. पक्षातील कथित आरोपांच्या पार्श्वभूमीवर उमेदवार बदलाची हवा गेल्या पंधरा दिवसांपासून या पक्षात सुरू होती त्या पार्श्वभूमीवर ही दोन नावे आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे.लोकसभा निवडणुकीच्या तारखांचा उत्सुकता राजकीय पक्षांना होती. आता तारखांची उत्सुकता संपून उमेदवार कोण? याबाबत उत्सूकता लागून आहे.उमेदवारीसाठी रस्सीखेचभाजपाकडून जळगाव लोकसभा मतदार संघात खासदार ए.टी. पाटील, आमदार स्मिता वाघ, पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार व बांधकाम व्यावसायिक प्रकाश पाटील यांची नावे चर्चेत होती. पक्षातील वेगवेगळ्या वरिष्ठ नेते मंडळींकडून यातील काही जणांसाठी प्रयत्न सुरू होते. मुंबईत पक्षाच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत यावर चर्चा झाली. काही आरोपांच्या पार्श्वभूमीचा या बैठकीत गांभीर्याने विचार झाल्याचे समजते.नेते मंडळींकडून प्रयत्नबैठकीनंतर दोन नावे पुढे आली. यात पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार यांच्यासाठी काही स्थानिक नेत्यांनी शक्ती लावली तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे हे आमदार स्मिता वाघ यांच्यासाठी आग्रही असल्याचे समजते. अंतिम यादीत ही दोन नावे दिल्ली दरबारी पाठविण्यात आल्याचे वृत्त आहे.कोण आहेत स्मिता वाघस्मिता वाघ या विद्यार्थी परिषद चळवळीतून भाजपात आल्या आहेत. अमळनेर तालुक्यातील डांगरी येथे ग्रा.पं.सरपंच, जि.प. सदस्य, जि.प. अध्यक्ष व विधान परिषदेत आमदार अशी त्यांची वाटचाल आहे.पक्षाची राज्यस्तरावरील विविध पदे त्यांनी भुषविली आहेत. भाजपाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या त्या पत्नी आहेत.कोण आहेत करण पवारकरण पवार हे मुळचे पारोळा तालुक्यातील आहेत. त्यांचा राजकीय वारसा मोठा आहे. वडिल पूर्वी जि.प. सदस्य होते तर आजोबा आमदार होते. सद्य स्थितीत काका डॉ. सतीश पाटील हे राष्टÑवादीचे विद्यमान आमदार आहेत.मतदार संघातील पारोळा, भडगाव, एरंडोल तालुक्यात ‘पवार-पाटील’ कुटुंबाचा चांगला होल्ड असल्याचे तसेच पाचोरा तालुक्यातील माजी आमदार दिलीप वाघ यांच्यासह काही बड्या नेत्यांशी नातेससंबंधांची जोड त्यांनी मांडल्याचे समजते.ते सध्या नगराध्यक्ष असले तरी त्यापूर्वी राष्टÑवादीचे नगरसेवक होते. नातेसंबंधांच्या जोरावर विविध पक्षांकडूनही छुप्या मदतीची समिकरणे त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे मांडल्याचे बोलले जात आहे. येत्या दोन - तीन दिवसात भाजपाकडून नावे जाहीर होण्याची शक्यता आहे.रक्षा खडसे कायम...रावेर लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार रक्षा खडसे यांचे नाव पक्षश्रेष्ठींकडून दिल्ली दरबारी पाठविण्यात आल्याचेही बोलले जात आहे. या मतदार संघातून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी निवडणूक लढवावी असा एक प्रयत्न झाला. मात्र खडसे यांनी त्याला नकार दिल्याने रक्षा खडसे यांना पुन्हा संधी निश्चित झाल्याचे वृत्त आहे.दोन्ही मतदार संघात महिलांना संधीकथित आरोपांचे विरोधी पक्षाकडून भांडवल होण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजपाकडून दोन्ही मतदार संघात महिलांना संधी देण्याचे प्रयत्न आहेत. विरोधकांकडून कोणतेही भांडवल केले जाऊ नये व महिला मतदारांना खूश करण्याचा यातून प्रयत्न असल्याचे बोलले जाते. यात आता दिल्लीचे श्रेष्ठी काय निर्णय घेतात? याकडे पक्षातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :Politicsराजकारण