आॅनलाईन लोकमतचाळीसगाव दि. २४ : चाळीसगाव तालुक्यातील रोहिणी (लक्ष्मीची वाडी ) भागातील बाळकृष्ण भिकाजी दराडे (३० ) यांना शेतात काम करीत असताना फुटलेल्या पाईपलाईनमध्ये हात घातल्याने सर्पदंश झाला. डॉक्टरांनी तत्काळ उपचार केल्याने या तरुणाला वाचविण्यात यश आले.बुधवारी बाळकृष्ण हे शेतात काम करीत असताना त्यांनी पाईपात हात घातला. यावेळी त्यांच्या बोटाला काहीतरी स्पर्श जाणवला. मात्र त्यांनी तात्काळ बोट बाहेर काढण्याचा प्रयत्न केल्यावर बोटाला धरूनच नाग पाईपातून बाहेर निघाला. त्यांना तळेगाव येथे प्राथमिक केंद्रात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ प्रमोद सोनवणे यांनी तातडीने उपचार सुरू केले. प्रसंगावधान राखून उपचार करणाºया डॉ.सोनवणे यांच्यामुळे तरुणाचे प्राण वाचले.
चाळीसगाव तालुक्यातील तरुणाला सर्पदंश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 4:39 PM
डॉक्टरांनी तत्काळ उपचार केल्यामुळे रुग्णाला वाचविण्यात यश
ठळक मुद्देपाईपात हात घातल्यानंतर झाला सर्पदंशतळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात केले उपचारतरुणाची प्रकृती आता धोक्याबाहेर