जळगाव : परराष्ट्र खाते संभाळताना सुषमा स्वराज यांचा कणखरपणा देशवासीयांसह वेगवेगळ््या देशांच्या सदस्यांनीही विविध बैठकांद्वारे अनुभवला आहे. त्यांच्या या कणखरपणासोबतच त्या किती कुटुंबवत्सल व मातृह्रदयी होत्या, हे जळगावकरांनी खास अनुभवले आहे. या सोबतच सत्तारुढ खासदार असो की विरोधी पक्षाचे खासदार, कोणीही त्यांना भेटले की, त्या प्रत्येकाशी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून हितगूज साधत असत, अशा आठवणी जळगावातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सांगितल्या.भाजपच्या ज्येष्ठ नेत्या तसेच माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे निधन झाल्याने भाजपच्या सर्वच पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शोक व्यक्त केला आहे. यामध्ये सुषमा स्वराज यांच्या जळगाव दौऱ्याविषयी तसेच त्यांच्या दिल्ली येथे झालेल्या भेटीविषयीदेखील आठवणी सांगितल्या.महामार्गावर उभारण्यात आलेल्या दूरदर्शन टॉवरच्या उद््घाटनासाठी तत्कालीन माहिती व प्रसारण मंत्री सुषमा स्वराज यांना निमंत्रित करण्यात आले होते व त्यांचा दौराही निश्चित झाला होता. मात्र त्याच वेळी स्वराज यांच्या मुलीची इयत्ता बारावीची परीक्षा असल्याने मुलीने परीक्षेवेळी दौºयावर जाऊ नको, अशी विनंती केली. त्यावेळी स्वराज यांनी मुलीची ही विनंती मान्य केली व त्या जळगावला येऊ शकल्या नाहीत. त्या वेळी एक कुटुंबवत्सल व मातृह्रदयी नेत्याचेही दर्शन या निमित्ताने झाल्याचे जळगावातील भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते उदय भालेराव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.अन् जळगावातील शासकीय कार्यक्रम झाले रद्दसदैव प्रसन्न मुद्रा, दिलखुलास व्यक्तीमत्त्व अशी ओळख असलेल्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी २००४मध्ये लोकसभा निवडणुकीच्यावेळी जळगावला भेट दिली होती. त्या वेळी स्वराज यांचे जळगाव येथे पोलीस कवायत मैदानावर हेलिकॉप्टरने आगमन झाले. या ठिकाणी माजी खासदार वाय.जी. महाजन, माजी मंत्री एम.के. अण्णा पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. त्या वेळी ‘कैसो हो महाजन साहब...’ अशा शब्दात वाय.जी. महाजन यांची वैयक्तीकरित्या चौकशी केली. त्या वेळी प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्याशी त्यांचा असलेला जिव्हाळा त्यातून दिसून आल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पोलीस कवायत मैदानावरून त्या अजिंठा विश्रामगृहावर पोहचल्या. त्यानंतर अर्ध्याच तासात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन आचारसंहिता लागू झाली. त्यावेळी स्वराज यांनी लगेच अजिंठा विश्रामगृह सोडले व खाजगी हॉटेलमध्ये रवाना झाल्या. दौºयातील सर्व शासकीय कार्यक्रम रद्द झाले. मात्र त्यांनी खाजगीरित्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करून माहिती जाणून घेतली.खाजगी हेलिकॉप्टरने त्या आल्या होत्या. त्यामुळे परतीच्या प्रवासाला त्यांना काही अडचण आली नाही.स्वराज यांच्या पुढाकाराने मराठी बातम्यांचे स्थान कायमआकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाºया मराठी बातम्या रद्द करण्याचा घाट प्रसार भारतीच्या अधिकाºयांनी घातला होता. त्या वेळी तत्कालीन खासदार वाय.जी. महाजन यांनी तत्कालीन माहिती व प्रसारण मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली ही बाब लक्षात आणून दिली. त्या वेळी हा मराठी भाषेवर अन्याय असल्याचे सांगत या बातम्या प्रसारीत करणे सुरूच ठेवा, अशा सूचना स्वराज यांनी दिल्या होत्याय त्यामुळे या बातम्यांचे स्थान आजही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावर कायम असल्याचे या भेटीचे साक्षीदार असलेले उदय भालेराव यांनी सांगितले.पुरणपोळीचा घेतला पाहुणचारपुरणपोळीला खास पसंती असल्याने पुरणपोळी खायची असल्याचे स्वराज यांनी जळगाव भेटीदरम्यान सांगितले होते. त्या वेळी त्यांच्यासाठी खास पुरणपोळी करण्यात आली व तो पाहुणचार स्वराज जळगावात घेतला होता, अशी आठवण आमदार सुरेश भोळे यांनी सांगितली.अभ्यासू नेतृत्त्व हरपलेसुषमा स्वराज या हाडाच्या नेत्या होत्या. विविध पदांवर त्यांनी काम केले तरी त्यांचा कार्यकर्त्यांशी असलेला जिव्हाळा हा सर्वांनाच भावणारा होता. त्यांच्या निधनाने पक्षाचे मोठे नुकसान झाले असून पक्ष एका अभ्यासू नेतृत्त्वाला मुकला आहे.- आमदार सुरेश भोळेसुषमा स्वराज म्हणजे एक दिलखुलास व्यक्तीमत्त्व होते. सदैव प्रसन्न मुद्रा असलेल्या स्वराज या सत्तारुढ असो की विरोधी पक्षाचे खासदार, पदाधिकारी या सर्वांशी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून संवाद साधत असत.- उदय भालेराव, ज्येष्ठ कार्यकर्ते.
कणखर तेवढ्याच कुटुंबवत्सल व मातृह्रदयी नेत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 12:57 PM