अध्यात्म :
म्हणूनी शरण जावे, सर्वभावे देवासी
तोहा उतरील पार, भव दुस्तर नदिचा...
बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम ज्या
तुका म्हणे साक्षी आले, तरी केले प्रगर
भगवंतला शरण जाण्याचे आपल्या सारख्या जडजीवाला कारण असते की, आपण सकाम व निष्काम भावनेने भगवंताला शरण जावे. सकाम ते मध्ये भगवंतात प्रार्थाना करावी की, हे ईश्वरा आमच्या वंशामध्ये दुबुद्धी होऊ देऊ नको, सद् बुद्धी साधकाच्या ठिकाणी असली तरच साधक सर्वभावाने देवाला शरण जावू शकतो. साधकाच्या ठिकाणी जर दुबुद्धी असली तर भावानेच काय साधक देवालाच शरण जावु शकत नाही. सद् बुद्धीने धर्माचरण शुद्ध होते. आचरणाने भाव शुद्ध होतो. निश्चयात्मक भाव झाला की भगवंत प्रगट होतो. असा हा भाव साधकामध्ये प्रगट झाल्यानंतर भगवंत आपल्याला या मायेच्या संसार सागरातुन तारून नेतील. परमात्मा करुनाधन, दयाधन, पतितांचा तारण आहे. तो अत्यंत हे त्याचे नाम आहे. ज्याचा अंत नाही, असा अनंत तो साधकांवर, शरणगतांवर करुणा करतो. तुकाराम महाराज असे म्हणतात, की मला हे अनुभवातुन आले. म्हणून आपल्यासमोर प्रकट केले.
समारोप : महाराज आपल्या सारख्या साधकांना उपदेश करतात की, सर्वभावाने देवाला शरण जावे. म्हणजे परमात्मा आपल्या साधकाचे कल्याण करतो.
निरूपण : हभप. दादा महाराज जोशी, जळगाव.