वरखेडी, ता.पाचोरा, जि.जळगाव : राज्यमार्गावर विखुरलेली वाळू झाडून पी.डी.बडोला माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपली व समाजापुढे एक आदर्श उभा केला.भोकरी येथील राज्यमार्ग क्रमांक १९ वर जवळजवळ १०० मीटरपर्यंत वाळू पसरलेली होती. यामुळे वाहन घसरून अपघात होण्याची शक्यता निर्माण झालेली होती. आज सकाळी सातला शाळेच्या वेळेत शाळेवर जात असताना पी.डी.बडोला माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.एस.चौधरी यांनी ही परिस्थिती बघितली व शिक्षक एम.एस.पिंजारी व चार विद्यार्थ्यांना सोबत घेऊन राज्यमार्गावरील वाळू खराटा व केरसुणीच्या सहाय्याने झाडून बाजूला सारली व सामाजिक बांधिलकी जपली. तसेच यातून विद्यार्थ्यांना अप्रत्यक्षरीत्या समाजाप्रती नैतिक मूल्य जपण्याचा पाठ विद्यार्थ्यांच्या अंगी रुजविला. तसेच विद्यार्थ्यांना शिकवण दिली की, समाजात डोळसपणे वागल्याने आपण लहान मोठ्या घटना दुर्घटना कशा टाळू शकतो हेदेखील सांगितले. यासाठी रस्ता सुरक्षा वाहतूक सप्ताहाचाच मुहूर्त असायला हवा, असे नसते. बडोला विद्यालयाच्या मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे वाहनधारक व ग्रामस्थांनी कौतुक केले.
राज्य मार्गावर विखुरलेली वाळू झाडून विद्यार्थ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 2:57 PM
राज्यमार्गावर विखुरलेली वाळू झाडून पी.डी.बडोला माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपली व समाजापुढे एक आदर्श उभा केला.
ठळक मुद्देबडोला विद्यालयातील विद्यार्थी, मुख्याध्यापक व शिक्षकांचा उपक्रममान्यवरांनी केले कौतुक