एरंडोल : शहरातील गांधीपुरा भागात छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ, सुखकर्ता फाउंडेशन व सूर्यवंशी क्षत्रिय मराठा समाज यांच्या संयुक्त विद्यमानाने (तिथीनुसार) शिवजयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.यामध्ये शिवशाहीर ह.भ.प. गोपाल महाराज चिमठाणेकर यांचे शिवचरित्रावर प्रेरणादायी कीर्तन झाले. या सोहळ््यादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ््याची ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.राष्ट्रीय महिला कीर्तनकार ह.भ.प. वनिता पाटील भिवंडीकर यांचे शिवचरित्र, व्यसनाधीनता, स्त्री भृण हत्या व इतर सामाजिक समस्यांवर प्रभावी कीर्तन झाले.नगराध्यक्ष रमेश परदेशी, विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, माजी विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश महाजन, प्रा. मनोज पाटील, कुणाल महाजन, सुभाष मराठे, अतुल महाजन, सुनील मराठे, मनोज मराठे, विठ्ठल आंधळे, नितीन बिरला यांच्याहस्ते छत्रपती शिवरायांचे पूजन करण्यात आले.माजी उपनगराध्यक्ष छाया दाभाडे, नगरसेविका प्रतिभा पाटील, सुरेखा चौधरी, हर्षाली महाजन, आरती महाजन, शकुंतला अहिरराव, आरती ठाकूर, क्षमा साळी या महिलांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ््याचे पूजन करण्यात आले.सुखकर्ता फाउंडेशनच्या डॉ.गीतांजली ठाकूर यांनी राष्ट्रीय महिला कीर्तनकार वनिता पाटील यांचे स्वागत केले.
एरंडोल शिवजयंती महोत्सवातून दिले सामाजिक संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 4:36 PM