चाळीसगाव, जि.जळगाव : पूर्वीच्या गुरुकुल पद्धतीचे आधुनिक रुप म्हणजेच आश्रमशाळा. निवासी शाळांमध्ये संघर्ष, समूह व्यवस्थापन असे गुण वाढीस लागतात. विद्यार्थी निर्णयक्षम बनतो. समाजाचे उद्याचे भविष्य म्हणजेच आजचे विद्यार्थी. शेवटी समाजहित हेदेखील शिक्षणाचे एक अंगच असल्याचे हितगूज अंबाजी (बेलगंगा) शुगर इंडस्ट्रीजचे मुख्य प्रवर्तक चित्रसेन पाटील यांनी गुढे, ता.भडगाव येथे व्यक्त केले.येथे आदिवासी आश्रमशाळेत त्यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी गणवेश वितरण व वृक्षारोपण सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष उद्धवराव महाजन तर प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक दिनेश पाटील, प्रेमचंद खिंवसारा, दिलीप रामराव चौधरी, विनायक वाघ, शरद मोराणकर, किरण देशमुख, रवींद्र केदारसिंग पाटील, अजय शुक्ला, राजेंद्र धामणे, सुशील जैन, नीलेश वाणी, नीलेश निकम आदी व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. शाळा परिसरात वृक्षारोपणही केले गेले. सूत्रसंचालन ज्योती मोरे व पंकज माळी यांनी केले. प्रास्ताविकात मुख्याध्यापक विजय महाजन यांनी उपक्रमांची माहिती दिली. आभार किशोर शिंपी यांनी मानले.
समाजहित हे शिक्षणाचे एक अंगच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 3:56 PM