जळगाव : स्मार्ट इंडिया हॅकथॉन या स्पर्धेत एस. एस. बी. टी.महाविद्यालयाचा संघ राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम ठरला. या संघातील विद्यार्थ्यांनी वस्त्र मंत्रालयासाठी तयार केलेले सॉफ्टवेअर सर्वोत्तम ठरले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’ तसेच ‘स्टार्ट अप इंडिया’ या सारख्या उपक्रमामध्ये युवकांचा सहभाग वाढावा यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्मार्ट इंडिया हॅकथॉन- २०१९ ही राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत ७५०० संघामधून निवड झालेल्या १२०० संघामध्ये एस . एस. बी. टी. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोन संघाचा समावेश होता. या पैकी एक संघ कोईम्बतूर व दुसरा संघ गुवाहाटी येथे पाठवण्यात आला होता.गुवाहाटी येथे पाठवण्यात आलेल्या संघात हषार्ली सुभाष तायडे, हितेश अशोक धर्माधिकारी, सुमित अनिल वाणी, वैभव ईश्वर गावित, साहिल विजय चौधरी, बागवान महोम्मद फिरोज महोम्मद याकूब या विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यांना डॉ. मनोज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी ‘वस्त्र मंत्रालय’ साठी प्रोजेक्ट केला होता.या समस्येवर प्रायोगिक अमल करण्यासाठी या विद्यार्थ्यांना सलग ३६ तास बसून सॉफ्टवेअर विकसित करायचे होते. यामध्ये एक इ-पोर्टल वेबसाइट बनविली होती. या सॉफ्टवेअरची प्रथम क्रमांकाने निवड करण्यात आली. विकसित केलेल्या सॉफ्टवेअरचे मूल्यमापन करण्यासाठी विविध सॉफ्टवेअर कंपनीचे तज्ञ तंत्रज्ञ व वस्त्रोद्योगात अनुभवी व्यक्तींचा सहभाग होता. त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे सॉफ्टवेअरमध्ये यशस्वी बदलही विद्यार्थ्यांनी करून दाखवले. सर्व पयार्यांचा विचार करता भारताच्या टेक्सटाइल उद्योगाच्या भरभरासाठी उत्तम व्यासपीठ प्रदान करणारे हे सॉफ्टवेअर आहे, असे सवार्नुमते नमूद करण्यात आले.कोईम्बतूर येथे ईशा श्रीवास्तव, प्रियंका कालिदास बारपांडे, ऋचा लीलाधर नारखेडे, डिम्पल संतोष पाटील, श्रद्धा मुकेश आहुजा, वर्षा पंजाबराव पाटील या सहभागी विद्यार्थ्यांना प्रा. डॉ. के. पी. अढिया यांनी मार्गदर्शन केले.वस्त्र कारागिरांसाठी आॅन लाईन मार्केट...भारतातील विविध ग्रामीण भागात विविध उद्योग कला जोपासणारे कुशल कारागीर आहेत. परंतु व्यापारी मंचाच्या अभावी त्यांच्या कलाकुसरीचा प्रसार होण्यावर मर्यादा येत होत्या. कुशल कारागिरांची हि अडचण ओळखुन एस. एस. बी. टी. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वस्त्र लघु उदयोगासाठी ‘आॅन लाईन मार्केट’ निर्माण करायचे ठरवले. या आॅनलाईन मार्केटच्या माध्यमातून पारंपारिक वस्त्र कारागीर, डिझाइनर तसेच वस्त्र साहित्य निर्माण करणाऱ्यांना एका मंचावर आणण्याचा प्रयत्न केला आहे.
वस्त्र मंत्रालयासाठी तयार केले सॉफ्टवेअर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 1:25 PM