चाळीसगाव - बी. पी. आर्टस, एस.एम.ए. सायन्स, के. के. सी. कॉमर्स कॉलेज आणी के.आर. कोतकर ज्यूनीयर कॉलेज मध्ये १० केव्हीए क्षमतेच्या सोलर ऊर्जा प्रकल्पाचा उदघाटन समारंभ नुकताच जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी संस्थेच्या मॅनेजींग बोर्डाचे चेअरमन नारायणदास अग्रवाल होते. उमंग समाज शिल्पी परीवाराच्या अध्यक्षा संपदा पाटील, उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, डॉ. एम. बी.पाटील, श्यामलाल कुमावत, क. मा. राजपूत, मु. रा. अमृतकार, डॉ. सुनील राजपूत, भाजपा तालुकाध्यक्ष के. बी. साळुंखे, ज.मो. अग्रवाल, योगेश अग्रवाल, अशोक बाबुलाल वाणी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्तविक प्राचार्य डॉ .मिलिंद बिल्दीकर यांनी केले.चाळीसगाव महाविद्यालयाने अपारंपरिक ऊर्जा श्रोताचा वापर करण्यासाठी सौर प्रकल्पची उभारणी केली. ही बाब खरोखर समाजापुढे आदर्श निर्माण करणारी आहे. अपारंपरिक ऊर्जा श्रोतांच्या माध्यमातून घरोघरी उर्जा निमीर्ती केली जाऊ शकते. व त्यातून अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतात. ग्रामीण भागातील विद्यार्थां नोकरी च्या मागे न जाता रोजगार निमार्ती करू शकतो. तसेच महाविद्यालयाने व्यावसायिक अभ्यासक्रमांवर भर देऊन तरुणांना रोजगारभिमुख करावे. तालूक्यातील इतर शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना हा प्रकल्प आवर्जून दाखवावा, असे आवाहन करीत महाविद्यालयाच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून सवोर्तोपरी मदतीचे आश्वासनही खासदार पाटील यांनी यावेळी दिले.संपदा पाटील, के. बी. साळुंखे, संचालक योगेश अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतात नारायणदास अग्रवाल म्हणाले की गेल्या काही वर्षांमध्ये, विजेचे दर कमालीचे वाढले आहेत. सौरऊर्जा निर्माण केल्यास आपल्या विजेच्या बिलात बचत होईल. संस्थेचा माजी विद्यार्थी खासदार झाल्याचा खूप आनंद झाला. सुत्रसंचलन प्रा. रवींद्र पाटील यांनी केले तर आभार उपप्राचार्य अजय काटे यांनी मानले.
चाळीसगाव महाविद्यालयाने साकारला सौरऊर्जा प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 3:55 PM