शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

हक्काच्या पैशांसाठी वृद्धाची याचना

By admin | Published: April 11, 2017 12:29 AM

अमळनेर : ठेवीदार संघटनेच्या बैठकीत अनेकांनी वाचला समस्यांचा पाढा, प्रांतांच्या अधिका:यांना सूचना

अमळनेर : जेल भरो केले.. उपोषण केले.. पण एक रुपया मिळाला नाही. दाद कोणाकडे मागावी. कसे करावे.. बाकीचे सोबती चालले गेले.. कुठे जावे.. औषधाला पैसे द्या हो.. औषधाला पैसे द्या, असे म्हणत 80 वर्षीय रामभाऊ सैंदाणे यांच्या डोळ्यात पाणी आले.. सैंदाणे यांनी हक्काच्या पैशांसाठी केलेली याचना बघून उपस्थितांनाही गहिवरून आले. आज ठेवीदार संघटनेची बैठक प्रांताधिकारी संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात वरील प्रसंगाचा उपस्थितांना अनुभव आला.2008 पासून पतसंस्थांमधील ठेवी मिळण्यासाठी जीवाची तगमग करणा:या रामभाऊ सैंदाणे यांना घशाचा पॅरालिसिस झाल्याने जेवता येत नाही. पोटात नळ्या टाकून ‘लिक्विड’वर ते जगत आहेत. त्यांनी पोटावरील शर्ट उचकवून शरीराची अवस्था दाखवताना केलेला कळवळा पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले आणि समस्यांचा पाढाच सुरू झाला. कुणाला पत्नीचे ‘बायपास’ करायचे, कुणाला स्वत:चा इलाज करायचा, तर कुणाचे डोळ्यांचे ऑपरेशन करायचे. समस्या ऐकून प्रांताधिकारी संजय गायकवाडही भावनावश झाले. जनतेचा पैसा कष्टाचा आहे. मेहनतीचा आहे. पतसंस्थांचे आर.आर.सी. पाठवा, बोजे लावा, संस्थाचालकांच्या मालमत्ताच जप्त करा, अशा सुूानाही त्यांनी सहायक निबंधक प्रताप पाडवी यांना दिल्या. ठेवीदार संघटनेचे अध्यक्ष उमाकांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली ठेवीदारांनी आपल्या समस्या मांडल्या. तीन वर्षे झाले आम्हाला पावाणा मिळालेला नाही. वसुली अधिकारी येत नाहीत. बी.डी. शिंदे हे वसुली अधिकारी सहाव्यांदा बैठक होऊनही बैठकीला नाहीत. 10 पैकी चारच वसुली अधिकारी बैठकीला उपस्थित असल्याचेही ठेवीदारांनी निदर्शनास आणून दिले.दरम्यान, या वेळी सहायक निबंधक प्रताप पाडवी यांनी सांगितले की, मंगलमूर्ती पतपेढी विकली, तिचे तीन कोटी जमा आहेत. दोन कोटी ठेवीदारांना दिले असते. परंतु ही बाब उच्च न्यायालयात गेल्याने कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्या वेळी ठेवीदारांनी जनता पतपेढीचा पैसा पडला आहे तो वाटप करा, अशी मागणी केली असता पाडवी म्हणाले, यात ठेवीदार कोणते, कजर्दार कोण याचा सविस्तर अहवाल मिळालेला नसल्याने ऑडिट करण्याची गरज आहे. त्यानंतर पैसा वाटप केला जाईल. दरम्यान, नगरपरिषदेने थकीत मालमत्ता करापोटी चार पतपेढय़ा सील केल्या आहेत. त्यामुळे आतापावेतो प्रशासकाचा पदभार न घेणा:या वसुली अधिका:यांनी पदभार नसल्याने वसुली कशी करणार म्हणून समस्या मांडल्या. सारे दप्तरच सील झाल्याने तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. सहायक निबंधक पाडवी मदत करतात. परंतु त्यांना 15 दिवस जिल्हा उपनिबंधक जळगाव, नाशिक येथे बैठकीला बोलावले जाते. त्यांच्या हाताखाली काम करणारे अधिकारी ऐकत नाहीत, असेही आरोप उमाकांत नाईक यांनी केले. वसुली अधिकारी एन.के.पाटील म्हणाले, आम्हाला कार्यालयीन कामकाजासाठीही तातडीचे आदेश दिले जातात. एखादा दिवस वसुलीला काढावा तर लोक लगेच पैसे देत नाहीत. पोलीस बंदोबस्ताचीही गरज असल्याचे सांगितले.या बैठकीस एन.के.पाटील, विलास सोनवणे, हेमंत कासोदेकर, अॅड. प्रकाश बडगुजर, अॅड.राजेश कुलकर्णी, डॉ.संचेती, विलास ब्रrो, हेमराज पाटील यांच्यासह अनेक  ठेवीदार उपस्थित होते.    (वार्ताहर)