शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

गाव पाणीदार झाल्याचे सर्वाधिक समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 8:48 PM

राज्यस्तरीय वॉटर कप स्पर्धेत तयारीनिशी उतरलो, पण पारोळा तालुकास्तरावर समाधान, नाला खोलीकरणामुळे विहिरी भरल्या

पारोळा, जि.जळगाव : पहिल्यादा चोरवड गावातील सारे जण श्रमदानासाठी अहोरात्र एकत्र आले. गावाला सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत राजस्तरीय बक्षीस मिळवायचे या जिद्दीने उतरले पण बक्षीस तालुकास्तरीय मिळाले, तरी सर्व ग्रामस्थ खुश आहेत. कारण गाव यामुळे ‘पाणीदार तर झाले,’ अशी माहिती चोरवड, ता.पारोळा येथील ग्र्रामस्थ तथा जि.प.सदस्य डॉ.हर्षल माने यांनी पारोळा शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.पारोळा तालुक्यातून वॉटर कप स्पर्धेत तालुका स्तरावर १५ लाखांचे बक्षीस मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करताना डॉ.माने यांनी ही माहिती दिली. गावात यासाठी १९ ग्रामसभा घेतल्या. त्यात मनसंधारण केले. मग श्रमदानातून जलसंधारणाची कामे कशी करतात याचा व्हिडीओ पडद्यावर दाखविला आणि गावकऱ्यांचे मन याकडे वळविले. २८ गुण यासाठी लागतात म्हणून पहिल्या दिवसापासून ग्रामस्थांनी स्पर्धेसाठी श्रम घेतले. नर्सरी निर्माण केली. शोषखड्डे तयार केले. गावातील सर्व सांडपाणी त्यात जिरविले. निर्माण केलेल्या नर्सरीत ८ ते १० हजार रोपे तयार केली. गाव आगपेटी मुक्त केले. गावातील वा शेत शिवारातील कचरा जाळायचा नाही, तो शेतात खड्डे करून पुरायचा, अशी संकल्पना राबविली.८ एप्रिल रोजी गावातून ७०० पुरुष, ८०० महिला एकत्र येऊन मशाली घेऊन बैलगाडी व ट्रॅक्टरमधून गेले. श्रमदानातून नाला खोलीकरण व इतर जलसंधारणाची कामे केली असल्याची माहिती डॉ.हर्षल माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.या वेळी ग्रामस्थांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी यासाठी खासदार ए. टी. पाटील, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार वंदना खरमाळे यांनीही रात्री १२ वाजता चोरवड गावी श्रमदान केले होते.चोरवड ग्रामस्थांच्या ४५ दिवसांच्या अथक परिश्रमातून हे काम उभे राहिल्याची माहिती त्यांनी दिली. पारोळा तालुक्यात पाणी फाउंडेशनप्रमुख अमीर खान व किरण राव आले. त्यांना चोरवड गावी येण्यासाठी आम्ही आग्रह धरला, पण ते आले नाही. आम्ही सर्व जण नाराज होत नैराश्य आले. नैराश्याने आणि रागाने काही ग्रामस्थांनी या स्पर्धेतून बाहेर पडण्याबाबत बोलू लागले. पण सर्वांची समजूत काढली आणि अमीर खान याना गावाचे बक्षीस मिळवूनच बक्षीस घेताना भेटू, असा चंग बांधला आणि पुन्हा जोमाने जोरदारपणे प्रयत्न केला आणि गावाचा तालुक्यात पहिला नंबर आला. राज्यात नंबर आला नाही, याची खंत नाही, पण गाव गावकºयांच्या अथक परिश्रमातून गाव पाणीदार झाले याचे भूषण मात्र सर्वांना आहे, असे डॉ.माने यांनी या वेळी पत्रकार परिषदेत बोलून दाखविले.या वेळी म्हलार कुंभार, अ‍ॅड. भूषण माने, संदेश माने, रोहिदास नगराज पाटील, महेंद्र नितीन पाटील, राजेंद्र पाटील, भालेराव पाटील, सुनील पाटील आदी उपस्थित होते

टॅग्स :water shortageपाणीटंचाईParolaपारोळा