राम जाधव आॅनलाईन लोकमत दि़ ११ -दोन वर्षांपासून गडगडलेले कांद्याचे दर थोडेफार वाढत असतानाच सरकारने विदेशातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा एकदा कांद्याचे दर उतरणे सुरू झाले आहे़ त्यातच इतर राज्यांतील भागात पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्याने, आता देशाला कांदा पुरविण्याची जबाबदारी नाशिकवर असल्याचे म्हटले जात आहे़ खान्देशात यावर्षी पुरेशा प्रमाणात पाऊस नसल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवणार आहे़ तर पिकांसाठी पाणी मिळणार कुठून, अशी स्थिती आहे़ त्यामुळे रब्बीची तयारी करायला सांगणारे ‘साहेब’ खरीप येईल की नाही, याचीच शाश्वती नाही़दोन वर्षांपासून पडलेले कांद्याचे दर गेल्या महिन्यात कुठे वाढायला सुरू झाले होते़, तोच पुन्हा कांद्याचे दर पाडण्यासाठी सरकार प्रयत्नशील झाले आहे़ ग्राहकांची अत्यंत काळजी असलेल्या ग्राहक कल्याण मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक घेऊन इजिप्तमधून २४०० टन कांदा आयात केल्याचे व अजून ९ हजार टन कांदा आयात होत असल्याचे सचिवांनी सांगितले़़़़ या बैठकीला वाणिज्य आणि कृषिमंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, तसेच खासगी व्यापारीही आर्वजून उपस्थित होते.देशांतर्गत कांद्याचा दर वाढण्याआधीच ग्राहकांची इतकी काळजी घेणाºया सरकारला, दोन वर्षांपासून कांद्याला भाव मिळत नाही म्हणून कांद्याच्या शेतात रोटाव्हेटर फिरवणारे आणि कर्जबाजारी होऊन आत्महत्या करणारे शेतकरी मात्र दिसत नाही, हे आश्चर्यच!निघालेला कांदा मे, जून व शेवटी जुलैपर्यंत साठवणूक करून भाव मिळत नाही म्हणून शेतकºयांनी विकला आणि त्यानंतर लगेचच जुलै महिन्याच्या अखेरपासून कांद्याचे दर वाढण्यास सुरुवात झाली हे विशेष़ आता शेतकºयांकडे अल्पप्रमाणात माल आहे़ नवीन लागवडीसाठी पाणी नसल्याने खान्देशात कांद्याची लागवड यावर्षी घटणार आहे़ २० एकरवर लागवड करणारे शेतकरी यावर्षी केवळ २ एकरपर्यंतच कांद्याची लागवड करत आहेत़ तर अनेकांनी कांदा लागवडीसाठी राखून ठेवलेल्या शेतात आता दादर किंवा हरभरा लागवडीचे नियोजन सुरू केले आहे़ मागील आठवड्यात गुरुवारपर्यंत १२ ते १८ रुपयांपर्यंत कांद्याला ठोक भाव मिळत होता़ तो शुक्रवारी उतरून ११ ते १५ रुपये प्रती किलो झाला होता़शेतकºयांमध्ये निरुत्साहकांद्याला भाव नाही, पाणी नाही, त्यामुळे कांदा लागवडीसाठी शेतकºयांमध्ये निरुत्साह दिसून येत आहे़ त्यातच पाणी टिकण्याची शाश्वती नसल्याने, शेतकरी परतीच्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत़गेल्या दोन वर्षांपासून कांद्याला भाव मिळत नाही म्हणून आम्ही नुकसान झेलून कर्जबाजारी झालो़ मात्र आता थोडेफार दर मिळून पदरात काही पडेल त्यापूर्वीच जुलमी सरकारने ग्राहकांची काळजी घेण्याचे ‘सोंग’ आणले आहे़ इकडे बळीराजाचा नेहमीप्रमाणे बळी जातोय याचे मात्र सोयरसूतक कुणालाही नाही़ -विलास माळी, कांदा उत्पादक शेतकरी, चोपडा़
कांद्याचे कोडे काही सुटेना
By ram.jadhav | Published: September 11, 2017 1:17 AM
पाऊस नसल्याने लागवड घटणार, आहे त्यालाही भाव मिळेना
ठळक मुद्देसरकारचे शेतकºयांसाठी मारक धोरणस्थानिक शेतकºयांच्या मालाला भाव नाही आणि परदेशातून आवकनेहमीप्रमाणे बळीराजाचा जातोय बळी