जळगाव : मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनही पूर्ण प्रयत्न करीत आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगले काम करीत असून चार वर्षात राज्य प्रगतीपथावर नेले आहे. मात्र काही लोकांना त्यांचे चांगले काम बघवत नसल्याने मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेचे पिल्लू सोडत असल्याची टीका समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी गुरूवार, २६ रोजी येथे शिवसेनेचा उल्लेख न करता केली.मनपा निवडणुकीच्या प्रचारासाठी जळगाव दौऱ्यावर आलेले कांबळे यांची पत्रकारांनी गुरूवारी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.आरक्षणाबाबत पहिले नो-कॉमेंटस्मराठा आरक्षणाबाबत तसेच आता सर्वच समाजांना आर्थिक निकषावर आरक्षण देण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे विचारले असता सुरूवातीला त्यांनी आरक्षणाचा विषय तापलेला असल्याने उगाच वाद निर्माण होऊ नयेत, म्हणून बोलणे टाळत असल्याचे सांगितले. मात्र नंतर ते म्हणाले की, मराठा समाज सुशिक्षीत आहे. सुकाणू समितीतील मंडळीही समजदार आहेत. मुंबईतील आंदोलनात गडबड होत असल्याचे लक्षात येताच मराठा समाजाच्या सुकाणू समितीने आंदोलन तातडीने मागे घेतले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही त्यांची भावना योग्य आहे. शासनही त्याच्या एक पाऊल पुढे असून आरक्षण दिले पाहिजे, या मताचे आहे.मुख्यमंत्री बदलाची चर्चादेखील नाहीकांबळे म्हणाले की, राज्यात नेतृत्व बदलाच्या हालचाली सुरू झाल्याचे उगीचच पिल्लू सोडून दिले आहे. नेतृत्व बदलाचे कारणच नाही. फडणवीस यांनी साडेतीन-चार वर्ष खंबीरपणे काम पाहिले आहे.
काही लोकांना मुख्यमंत्र्यांचे चांगले काम बघवत नाही - राज्यमंत्री दिलीप कांबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:52 PM
शिवसेनेकडे टीकेचा रोख
ठळक मुद्देआरक्षणाबाबत पहिले नो-कॉमेंटस्मुख्यमंत्री बदलाची चर्चादेखील नाही