जळगाव : शहरातील सोनवणे कुटुंबीय आणि राजकारण हे जणू समीकरणच बनले आहे. गेल्या ५९ वर्षांपासून या कुटुंबातील सर्वच प्रमुख सदस्य राजकारणात आहेत. सरपंचपदापासून विधानसभेपर्यंतच्या निवडणुका कुटुंबातील सदस्यांनी लढविल्या असून त्यात यश मिळविले आहे. या निवडणुकीत कुटुंबातील चार जणांकडून उमेदवारी करण्यात येत आहे.जळगाव तालुक्यातील सुजदे-भोलाणे हे मूळ गाव असलेल्या या कुटुंबातील तोताराम आवसू सोनवणे यांनी १९५४ ते १९७० या कालावधीत गावचे सरपंचपद भूषविले. त्यांच्या पश्चात त्यांचे द्वितीय चिरंजीव पंडित तोताराम सोनवणे यांनी १९७१ ते १९७५ या कालावधीत, त्यानंतर मुरलीधर तोताराम सोनवणे यांनी १९७६ ते १९८५, वसंत तोताराम सोनवणे यांनी १९८६ ते १९९० या कालावधीत, सिंधू मुरलीधर सोनवणे यांनी १९९० ते १९९५ या कालावधीत, सुनील मुरलीधर सोनवणे यांनी १९९५ ते २००० या कालावधीत, अभिमन्यू सीताराम सोनवणे यांनी २००० ते २००५ या कालावधीत सरपंचपद भूषविले. गेल्या काही वर्षांपासून या कुटुंबातील सुनांकडे हे सरपंचपद आहे.सोनवणे कुटुंबाचे महापालिकेत वर्चस्वप्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या पाठोपाठ डॉ.अश्विन शांताराम सोनवणे हे २००१ मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले.सध्याही ते भाजपाचे विद्यमान नगरसेवक आहेत. भावनाताई शांताराम सोनवणे या देखील नगरसेविका होत्या. खंडेरावनगर भागात मुरलीधर सोनवणे यांनी नगरसेवक पद सांभाळले आहे. श्यामकांत सोनवणे हेदेखील अनेक वर्षांपासून नगरसेवक म्हणून काम पाहत आहेत. तत्पूर्वी १९९३ मध्ये त्यांनी पंचायत समितीचे उपसभापतीपद देखील भुषविले आहे. त्यांच्या पत्नी राखी श्यामकांत सोनवणे यांनी महापौरपद भूषविले आहे. नरेश बळीराम सोनवणे यांनीही नगरसेवकपद तसेच शिवसेनेचे शहरप्रमुखपद भूषविले आहे.जि.प.,कृउबावरही प्रतिनिधित्वसोनवणे कुटुंबाने सीताराम तोताराम सोनवणे यांच्या रूपात १९५५ मध्ये जि.प.मध्येही स्थान मिळविले. तत्कालीन ममुराबाद-म्हसावद गटातून ते जि.प. सदस्यपदी विजयी झाले होते. त्यानंतर पुढच्या पंचवार्षिकमध्ये त्यांनी जळगाव पं.स.समितीची निवडणूक लढवित सभापतीपद मिळविले. याच काळात ते जिल्हा बँकेवर तसेच शेतकी संघावरही संचालक होते. १९६५ पासून ते जळगाव कृउबाचे सभापती झाले. सलग १४ वर्षे ते कृउबाचे सभापती होते.प्रा.सोनवणे यांना आमदारकीची संधीबळीराम तोताराम सोनवणे हे देखील भावाच्या पावलावर पाऊल ठेवत जि.प.च्या राजकारणात उतरले. २००० साली जि.प. सदस्यपदी निवडून आले. विशेष म्हणजे लगेचच समाज कल्याण सभापतीपदही त्यांना मिळाले. त्यांच्या पत्नी सुमनताई यादेखील २००७ ते २०१२ या कालावधीत जि.प. सदस्या होत्या. त्यांचे सुपुत्र प्रा.चंद्रकांत सोनवणे हे १९९१ ते २००४ व २००९ ते २०१४ पर्यंत नगरसेवक म्हणून राहिले. त्यानंतर गेल्या निवडणुकीत ते चोपडा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून विजयी झाले.मनपा निवडणुकीत चार सदस्य अजमावताय नशीबजळगाव महापालिकेसाठी होणाऱ्या निवडणुकीत या वेळी सोनवणे कुटुंबातील चार जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. त्यात प्रभाग ५ ब मधून माजी महापौर राखी सोनवणे, प्रभाग ७ क मधून भाजपातर्फे डॉ.अश्विन सोनवणे, प्रभाग ११ अ मधून श्यामकांत सोनवणे तर प्रभाग १९ अ मधून आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या पत्नी लता चंद्रकांत सोनवणे या निवडणूक रिंगणात आहेत.
सोनवणे कुटुंबियांचा नगरसेवक, महापौर ते आमदारकीचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 2:49 PM
जळगाव शहरातील सोनवणे कुटुंबीय आणि राजकारण हे जणू समीकरणच बनले आहे. गेल्या ५९ वर्षांपासून या कुटुंबातील सर्वच प्रमुख सदस्य राजकारणात आहेत.
ठळक मुद्देप्रा.चंद्रकांत सोनवणे यांना आमदारकीची संधीसोनवणे कुटुंबाचे महापालिकेत वर्चस्वसोनवणे कुटुंबातील चार सदस्य शिवसेना व भाजपाकडून रिंगणात