शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

सोनू, तुला माङयावर भरोसा नाय काय ?

By admin | Published: July 16, 2017 12:39 PM

एक सोनू - लाख सोनू. सोनूला क्रिकेटमध्ये 25 टक्के आरक्षण पाहिजे

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 16 - आता हे काय आहे, असं विचारू नका. हे मोठय़ांचं बडबड गीत आहे. पूर्वी बडबड गीतं फक्त लहान मुलांसाठी असायची, आता मोठय़ांचीही असतात. आजच्या महिन्यानंतर काय असेल, ते सांगणं कठीण आहे; पण आज तरी हे ‘सोनूùù’ प्रकरण भलतंच ‘पापूलर’ आहे. यू-टय़ूबवर कोटी-दीड कोटी लोकांनी हे गाणं पाहिलंय म्हणे. गल्ली बोळातल्या पोरा-पोरींनी याचं आपापलं व्हर्शन तयार केलंय. या भाऊगर्दीत एखादं ‘व्हर्शन’ आपलंही असावं म्हणून हा लेखन प्रपंच!काय काय होतंय सोनूसाठी! सोनूसाठी संघर्षयात्रा निघते.. एक सोनू - लाख सोनू. सोनूला क्रिकेटमध्ये 25 टक्के आरक्षण पाहिजे.. सोनूसाठी राखीव जागा.. सोनूला आता ‘अच्छे दिन’ येणार ! सोनूला कजर्माफी मिळते.. त्याला हवी तेव्हा नाही, आम्हाला हवी तेव्हा.. राजकारणाच्या सोयीने. त्याचं श्रेय कोणाचं? सोनू सोडून सगळ्यांचं, खरंय की नाही, तूच सांग.. सोनूùù तुला माङयावर भरोसा नाय काय... नाय काय?सोनूला अकरावीत प्रवेश घ्यायचाय. आता काय करशील? हे बघ - तुझं आधार कार्ड आण, इलेक्शन कार्ड आण, रेशन कार्ड आण, ड्रायव्हिंग लायसेन्स आण, पॅनकार्ड आण, तलाठी दाखला आण, डोमिसाईल घेऊन ये, मतदार यादीची कॉपी आण, जातीचा दाखला आण, कॅरेक्टर सर्टिफिकेट दे, फलाणा दाखला आण, ढिकाणा दाखला आण.. या सगळ्यांची एक स्कॅन कॉपी, एक अॅटेस्टेड कॉपी आणि मूळ हजर करायचे...बास! मग झालीच तुझी अॅडमिशन.. म्हणजे ‘मॅनेजमेंट’ कोटय़ातून. देणगी लागेलच की रे! तुङया शिक्षण हक्कासाठी रे बाबा.. सोनूùù, तुला माङयावर भरोसा नाय काय.. नाय काय?सोनूला घर बांधायचंय. कर्ज पाहिजे? आपली बँक-इष्टेट बँक. मागेल त्याला कजर्. हे घे - या बेचाळीस पानी छापील करारावर तुङया सह्या कर. एकूण दोनशे चौदा सह्या होतात. हां हां - असं नाही. आधी त्या कराराच्या साडेतीनशे अटी नीट वाचून घे बरं. साहेब थांबतील 10 मिनिटं हवं तर. झाल्या वाचून? कर सह्या. आता तुङयाकडे काही थकीत कर्ज नाही, असा दाखला घेऊन ये पटकन. आजूबाजूच्या पंधरा-वीस बँकांचा आणलास तरी पुरे. जास्त नको. आमची कजर्प्रक्रिया अगदी सुलभ असते. सोनूचा संतोष हाच आमचा फायदा. सोनूùù, तुला माङयावर भरोसा नाय काय.. नाय काय?सोनूची मुलगी कॉलेजात जाते. मोठ्ठय़ा रूमालाने सगळा चेहरा झाकून बाहेर पडते. हातात मोबाइल - कानात ईअर फोन. कुणाशी बोलते माहीत नाही. आजकाल असं विचारायचं नसतं. सोनूने पोरीला ‘स्पेस’ दिलीय. सोनूची बायको म्हणते ‘मुलगी वयात आलीय’ जरा लक्ष ठेवा तिच्याकडे’ पण सोनूला प्रतिगामी विचार मान्य नाहीत. त्याने मुलीला पूर्ण मोकळीक दिली. ती तिने मनसोक्त वापरली. ‘करिङमा’वाल्या सडकछाप मजनूच्या जाळ्यात ती कधी अडकली, तिलाही कळलं नाही. सोनूला पत्ता लागण्यापूर्वी मुलीचा अबू-धाबीचा व्हिसा झालासुद्धा! आता मुलगी तिकडे कायमची. सोनूùù, तुला पोरीवर भरोसा नाय काय.. नाय काय?सोनूला थोडासा थकवा वाटला. तो बी.पी. तपासायला गेला. डॉक्टर म्हटले, ‘जरा शंका वाटते, अँजिओग्राफीच करून टाकू. शंका नको’ सोनूची रवानगी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला. मोठ्ठे डॉक्टर आले. त्यांनी अँजिओग्राफी केली. म्हणाले, ‘बाप रे. तुम्ही इथर्पयत आलातच कसे? आय वंडर - नाईंटी नाईन परसेंट ब्लॉकेज आहे’. लगेच प्लॅस्टी करायची असं ठरलं. तीन स्टेंट टाकावे लागले - मेडिकेटेड. पण जरा खर्च झाला. पाचेक लाख लागले एकूण. डॉक्टर म्हणतात, आता लाईफ स्टाईल बदला, बाकी मी आहेच! सोनूùù, तुला माङयावर भरोसा नाय काय.. नाय काय?सोनूला अपघात झाला. पायाला फ्रॅर झालं. हॉस्पिटलमध्येच कोणाच्या तरी ओळखीचे एक तरुण तडफदार वकील आले. म्हणाले, आमचे सिनियर अॅक्सिडेंट क्लेम चालविण्यात भलतेच एक्स्पर्ट आहेत, काळजीच करू नका. सध्या अडीअडचणीला हे 10 हजार ठेवून घ्या आणि या वकीलपत्रावर सही करा फक्त. आणि तीन चार विड्रॉअल स्लीपवरतीही सह्या करून ठेवा, तशी पद्धत असते. आमचे सर आता पोलीस, पंचनामे, इन्शुरन्स कंपनी - सगळ्यांना मॅनेज करून घेतील. क्लेमचे पैसे किती मिळाले, कधी मिळाले - सोनूला पत्ताच नाही. बँकेतून परस्पर गायब. पण सोनूच्या ‘हक्कासाठी’ लढलं कोण? सोनूùù, तुला माङयावर भरोसा नाय काय.. नाय काय?जो येतो तो सोनूला वापरून घेतो आणि सोनूच्या हाती काय? त्याच्या हातात भोपळा गोल गोल - पण सोनू तू आमच्याशीे गोड बोल! सोनूùù, तुला आमच्यावर भरोसा नाय काय.. नाय काय?- अॅड. सुशील अत्रे