लोकमत न्यूज नेटवर्क
एरंडोल : येथील नगरपालिकेतर्फे सुमारे चार कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या स्मार्ट आठवडा बाजाराच्या नूतन भव्य वास्तूचे लवकरच उद्घाटन करण्यात येऊन. व्यावसायिकांना गाळे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
आठवडा बाजाराच्या नव्या वास्तूत एकूण ९८ ओटे बांधण्यात आले आहेत. दलित वस्ती अंतर्गत हे बांधकाम करण्यात आले आहे. या गाळ्याच्या भाडेनिश्चितीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासन सूत्रांनी दिली.
ही भव्य वास्तू जुन्या आठवडा बाजाराच्या जागेवरच बांधण्यात आली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील जागा असल्यामुळे पुरे भाग व पुरे भागाकडील नवीन वसाहती तसेच शहराचा प्रमुख भागासह नवीन वसाहती या सर्वांच्या दृष्टीने सदर आठवडा बाजाराची जागा येण्या-जाण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांच्या सोयीचे आहे. या प्रकल्पामुळे शहराच्या सौंदर्यात नवीन भर पडणार आहे.
भाजीविक्री करणारे व इतर विक्रेते दीड वर्षांपासून जवळच्या परिसरात व रस्त्यालगत मिळेल त्या जागेत आपली दुकाने थाटत आहेत.
===Photopath===
011220\01jal_3_01122020_12.jpg
===Caption===
पालिकेतर्फे आठवडे बाजारासाठी उभारण्यात आलेली वास्तू