सामनेर, ता. पाचोरा : कोरोनाचे संकट सुरू असतानाच या भागातील सोयाबीन उत्पादकांवर दुबार पेरणीचेही संकट कोसळले आहे. यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत.या वर्षी पावसाची सुरुवातीस समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने विविध कंपन्यांची बियाणे आणून पेरणी केली. मात्र काहींची उगवण झाली नाही तर ज्यांची उगवण झाली ते पीक पिवळे पडल्याने फवारणी करुनही उपयोग झाला नाही. शेवटी काही शेतकऱ्यांनी सोयाबीनवर रोटावेटर फिरवला.यामुळे बहुतांश शेतकº्यांच्या सोयाबीन बियाणे विषयी तक्रारी आहेत. तरी अशा कंपन्यांवर कडक कारवाई करून शेतकºयांना योग्य तो मोबदला द्यावा अशी मागणी होत आहे.
सामनेर परिसरात सोयाबीन बियाणे झाले ‘फेल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 11:03 PM