जामनेर : जिल्हा परिषद शाळा बेटावद बुद्रूक येथील शिक्षकांनी पालकांच्या व ग्रामस्थ यांच्या सौजन्याने गावात बोलक्या भिंतीवर शालेय अभ्यासक्रमातील विविध ज्ञानवर्धक माहिती घराच्या भिंतीवर साकारत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शाळा गेल्या आठ महिन्यापासून बंद आहे. शालेय विद्यार्थ्यांना कोरोना काळातही ऑनलाइन, ऑफलाइन शिक्षण देणे सुरू आहे. काही विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अँड्रॉइड मोबाइल नसल्याने त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून माहेवार स्वाध्याय पुस्तिका वाटप करून नियोजन केले जात आहे.गावात विविध चौकात ग्रामस्थ, विविध दुकानदार,नोकरदार वर्ग, पालक यांच्या सौजन्याने बोलक्या भिंतीचा अभिनव उपक्रम राबवित आहे. यासाठी या मंडळीची आर्थिक मदत लाभत आहे. इयत्ता पहिली ते चौथी वर्गातील मराठी, गणित, विज्ञान, इंग्रजी, इतिहास याअभ्यासक्रमावर आधारीत विविध शैक्षणिक माहिती भिंतीवर लिहिल्याने विद्यार्थी चौकाचौकात त्याचे वाचन करीत आहे. त्यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडत आहे. गावकरी व विद्यार्थ्यांचा प्रतिसाद उत्तम लाभत आहे. शैक्षणिक माहितीसोबतच बेटी बचाओ, वृक्ष लागवड, स्वच्छता, पाणी काटकसरीने वापरणे, शिक्षणाचे महत्त्व यासंदर्भातील विविध घोषवाक्ये लिहण्यात आले असून सामाजिक जनजागृतीदेखील होत आहे.या अभिनव उपक्रमासाठी केंद्रप्रमुख नवल राजपूत, मुख्याध्यापक शांताराम सपकाळ, उपक्रमशील शिक्षक नीना सोनवणे, दिलीप गरुड, जुगलकिशोर ढाकरे, रवी पाटील, नरेंद्र मंगळकर तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नितेश दारकोंडे, उपाध्यक्ष शीला सुरवाडे, सर्व व्यवस्थापन समिती सदस्य, माजी सरपंच, प्रशासक, ग्रामसेवक, पोलीस पाटील, मंडळ अधिकारी तलाठी व दाते मंडळी तसेच पेंटर महेंद्र व योगेश सर्व ग्रामस्थ पालक वर्ग परिश्रम घेत आहे. सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे. तसेच गटविकास अधिकारी जे. व्ही.कवडदेवी, गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे, शिक्षण विस्तार अधिकारी रमेश दुसाने, विष्णू काळे,नरेंद्र चौधरी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
बेटावद बुद्रूक येथे अवतरल्या बोलक्या भिंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2020 2:16 PM
गावात बोलक्या भिंतीवर शालेय अभ्यासक्रमातील विविध ज्ञानवर्धक माहिती घराच्या भिंतीवर साकारत आहे.
ठळक मुद्देशाळेचा अभिनव उपक्रमज्ञानवर्धक माहिती घराच्या भिंतीवर