आॅनलाईन लोकमतभुसावळ, दि.२ : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वे प्रशासनातर्फे विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. दरम्यान, रेल्वेतर्फे सुरू करण्यात आलेल्या व इतर प्रवाशी गाड्यांचे योग्य तिकिट काढूनच प्रवास करावा,असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.४ रोजी गाडी क्रमांक ०१२६२ नागपूर येथून रात्री ११.५५ वा.निघेल.ती सीएसटीएमला दुपारी २.३५ वा.पोहचेल. ५ रोजी गाडी क्रमांक ०१२६४ नागपूर येथून सायंकाळी ७.५० वा.निघेल. ती सीएसटीएमला रात्री १२.१० वा.पोहचेल.५ रोजी ०१२६६ नागपूर येथून दुपारी ३.५५ वा.निघेल. ती सीएसटीएमला सकाळी ११.३५ वा. पोहचेल. ६ रोजी ०१२४९ ही गाडी सीएसटीएमहून दुपारी ४.५ वा.सुटेल. ती अजनी येथे सकाळी ९.३० वा.पोहचेल.६ रोजी गाडी क्रमांक ०१२५१ ही सीएसटीएमहून सायंकाळी ६.४० वा.निघेल. ती सेवाग्रामला सकाळी १०.३० वा.पोहचेल.७ रोजी गाडी क्रमांक ०१२५३ दादरहून रात्री १२.४० वा.निघेल.ती अजनीला दुपारी ३.५५ वा. पोहचेल. ७ रोजी गाडी क्रमांक ०१२५५ सीएसटीएमहून १२.३५ वा. निघेल. ती नागपूर येथे ३.३० वा.पोहचेल.८ रोजी गाडी क्रमांक ०१२५७ सीएसटीएमहून सायंकाळी ६.४० वा.निघेल. ती नागपूर येथे १२.१० वा.पोहचेल. ८ रोजी गाडी क्रमांक ०१२५९ दादरहून रात्री १२.४० वा.निघेल. ती अजनीला ३.५५ वा.पोहचेल.या शिवाय ५११५४ भुसावळ-मुंबई पॅसेंजर ५ रोजी, ५११५३ मुंबई-भुसावळ पॅसेंजरला ७ रोजी ११०३० कोल्हापूर-मुंबई एक्स्प्रेसला ५ रोजी आणि ११०२९ मुंबई-कोल्हापूर या गाड्यांना जादा डबे जोडण्यात येतील.प्रवाशांनी रेल्वे डब्यांवर चढून प्रवास करु नये. संपूर्ण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झाले आहे.त्यामुळे असे करणे धोक्याचे आहे. गरज नसतांना धोक्याची साखळी ओढू नये,असे करणे कायद्याने गुन्हा आहे. शिवाय गाडीच्या धावण्यातही त्यामुळे बाधा येते यासाठी दंडाची शिक्षा आहे, असे रेल्वेने कळविले आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष रेल्वे गाड्यांची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 7:17 PM
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वे प्रशासनातर्फे विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत.
ठळक मुद्देप्रवाशांनी रेल्वे डब्यांवर चढून प्रवास करु नये.गरज नसतांना धोक्याची साखळी ओढू नयेरेल्वे प्रशासनातर्फे विशेष गाड्यांचे नियोजन