भुसावळ, जि.जळगाव : मध्य रेल्वे प्रशासनातर्फे ख्रिसमस सणानिमित्त सोलापूर- नागपूर दरम्यान प्रवाशांसाठी विशेष गाडीचे चार फेऱ्या होणार आहेत.येणाºया ख्रिसमस सणानिमित्त सुट्ट्या पाहता रेल्वे प्रशासनातर्फे सोलापूर नागपूरसाठी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.गाडीच्या चार फेºया होणार आहेत. गाडी क्रमांक ०२१११ डाउन सोलापूर-नागपूर ही गाडी २२ रोजी सोलापूर येथून रात्री ८ वाजता सुटेल. दुसºया दिवशी दुपारी दीड वाजता नागपूर येथे पोहोचणार आहे. हीच गाडी परतीच्या प्रवासात नागपूर येथून २३ रोजी दुपारी तीन वाजता सुटेल व दुसºया दिवशी सकाळी ८:४० मिनिटांनी सोलापूरला पोहोचेल. या गाडीला कुडूर्वाडी, दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, वर्धा या ठिकाणी थांबा देण्यात आला आहे. या गाडीच्या एकूण चार फेºया होणार आहेत.गाडी क्रमांक ०२११३ डाऊन सोलापूर- नागपूर या विशेष गाडीच्या तीन फेºया होणार आहेत. ही गाडी २६ डिसेंबर रोजी सोलापूर येथून दुपारी एक वाजता सोडण्यात येणार आहे. दुसºया दिवशी सकाळी ५:१५ मिनिटांनी नागपूर येथे पोहोचेल. हीच गाडी परतीच्या प्रवासात २७ रोजी नागपूर येथून संध्याकाळी ७:४० वाजता सुटेल व दुसºया दिवशी दुपारी १:१० मिनिटांना सोलापूर येथे पोहोचणार आहेत. या गाड्यांचे आरक्षण २१ तारखेपासून सुरुवात होणार आहे. विशेष गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
ख्रिसमससाठी सोलापूर-नागपूरसाठी विशेष गाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 4:11 PM