शरीर वज्रा ऐसे। कवळी ब्रह्माण्ड जो पुच्छे ।। रामाच्या सेवका।
शरण आलो म्हणे तुका।।
शक्ती आणि भक्तीचे आचार्य ज्यांनी कामाला जिंकुन बंदीत ठेवले आणि काळाला तोडरी म्हणजे बेडी घातली, असे सकळ भक्तांचे भुषण असणारे
श्री हनुमंतरायांना माझा नमस्कार असो.
श्री मारुतीरायांचे सामर्थ्य फार अफाट, दिव्य होते. प्रभू रामचंद्र व रावण युध्दामध्ये कितीही बाण अंगावर आले, तरी त्याचा परिणाम होते? नव्हता. उलट त्या बाणांचे तुकडे व्हायचे असे सामर्थ्यवान श्री हनुमंतराय कोण होते? तुकोबाराय वर्णन करतात..
रामाच्या सेवका ,शरण आलो म्हणे तुका, प्रभू श्रीरामचंद्रांचे निष्ठावान सेवक . सेवा म्हणजे काय असते? ती कशी करायची असते? हे जर मनुष्य जीवाला शिकायचं असेल तर श्री हनुमंतरायांचे चरित्र आपल्याला शिकवत, मारुतीरायांनी जी सेवा केली. ती आपल्यासारखी नाही तर श्रीहनुमंतरायांनी जी सेवा केली ती म्हणजे हजारो राक्षसांचा संहार, वध करून आपल्या शेपटीत बांधून समुद्रात फेकून दिले. तरीही श्रीरामचंद्रांच्या पुढे श्रीरामनामाचा जप करीत हात जोडून सेवेसाठी उभे आहेतच... सेवेचे आचार्य म्हणजे श्री मारुतीराया आहेत
दास्यत्व निकट हनुमंत केले। म्हणुनी देखिले रामचरण।।
याचा अर्थ मनुष्याने भगवंताचे दास्यत्व हनुमंतासारखं करावं जेणे करून प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणाशी आपल्याला स्थान प्राप्त होईल. एकदा प्रभू श्रीरामचंद्र हे सर्वांना काहींना काहीं प्रसाद म्हणून देत होते. तेव्हा सीतामाई प्रभूंना म्हणतेय प्रभू तुम्ही सगळ्यांना दिल. पण मारुतीरायांना अजून का प्रसाद दिला नाही. तेव्हा प्रभू म्हणतात, माझ्याकडे काय त्याला देण्यासारखं आहे. तेव्हा सीतामाई मारुतीरायांना आपली सुंदर अशी बहुमूल्य असणारी हिऱ्याची माळ देते. मारुतीराय झाडावर बसतात, ती माईंनी दिलेली हिऱ्याची माळेतून एक एक मणी फोडतात आणि पाहतात की माझे प्रभू ह्या मण्यांमध्ये आहेत का? त्यात प्रभू दिसत नाही, ते बहुमूल्य मणी श्री मारुतीराया फेकून देत, कारण ज्यात भगवंताचा वास आहे. तेच मनुष्याने आपल्याकडे ठेवले पाहिजे. भगवंताचा वास नामामध्ये आहे. तेच भगवंताचे नाम मनुष्याने आपल्यात धारण केल पाहिजे. भगवंतांची निष्ठेने सेवा केली पाहिजे. मनुष्याचा सेवकभाव कसा असावा, ज्यांच्या चरित्रातून आपल्याला ज्ञात होत. मनापेक्षा ही ज्यांच्या वेग खूप गतीशील आहे. सामर्थ्यवान,शक्तीशाली चिरंजीव असे श्रीमारुतीरायांचे स्मरण केल्याने मनुष्याला आठ प्रकारच्या फळांची प्राप्ती होते.