येथील नगरपंचायत कार्यालयात सोमवारी सकाळी ११ वाजता शहरातील महत्त्वाच्या मंजूर विविध विकासकामांच्या ठरावासाठी ऑनलाईन विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. बैठक नगराध्यक्षा नजमा तडवी यांच्या अध्यक्षतेखाझाली झील. विकासकामांना एका गटाचा विरोध, तर सत्ताधारी गटाच्याच दुसऱ्या गटाने नागरिकांच्या पायाभूत मूलभूत समस्यांना आमचा कधीच विरोध नसेल असा पवित्रा घेत कामांना मंजुरी दिली. यावरून सत्ताधारी गटात सरळ सरळ दोन गट पडल्याचे दिसून आले, तर दुसऱ्या गटातील सदस्यांना शिवसेनेच्या सदस्यांनी पाठिंबा दिल्याने ऑनलाईन आलेल्या एकूण १५ सदस्यांपैकी ६ सदस्यांनी काही विषयांना विरोध केला, तर ऑनलाईन उपस्थित सत्ताधारी ५ नगरसेवक व ३ शिवसेनेचे नगरसेवक अशा एकूण आठ सदस्यांनी बहुमताने सर्व विकासकामांचे ठराव मंजूर करून घेतले.
दुसऱ्या गटाने ऑनलाईन व्हर्च्युअल सभा असताना गैरहजर सदस्यांच्या स्वाक्षरीनिशी विकासकामांच्या ठरावाविरोध असल्याचे पत्र दिल्याने बैठकीत गोंधळ झाला. त्यामुळे बैठकीत उपस्थित सदस्यांचेच मतभेद दिसून आले.
——
सदरील शासनाच्या परिपत्रकानुसार मंजूर विकासकामांना ठराव देण्यासाठी विषय क्र. १ ते ९ यांस ऑनलाईन उपस्थित नऊ सदस्यांनी बहुमताने मंजूर केले. या कामांची कागदोपत्री प्रक्रिया लवकरच होऊन या विकासकामांना सुरुवात होणार असून, विकासकामांसाठी मी कटिबद्ध आहे, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्षा नजमा तडवी यांनी दिली.
—-
नरगसेवकांच्या भूमिकेचे स्वागत
दरम्यान, मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या बैठकीत झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेनेचे गटनेते राजेंद्र हिवराळे यांनी मुक्ताईनगर विश्रामगृहावर रात्री आठ वाजेच्या सुमारास पत्रकार परिषद घेतली. नगराध्यक्ष तसेच सत्ताधारी गटाच्या गटनेत्यांसह पाच नगरसेवकांनी आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंजूर करून आणलेल्या विकासकामांना प्राधान्य देत पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे कौतुक आणि आभारदेखील आमदार पाटील व शिवसेना नगरसेवक आणि शिवसेकडून करत असल्याचे सांगितले.