धरणगाव, जि.जळगाव : विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि खेळ यात समतोल राखला तर त्यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होऊ शकते. म्हणून खेळा , जिंका आणि जीवनात यशस्वी व्हा, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू सई अनिल जोशी यांनी उद्घाटनप्रसंगी केले. क्रीडा सप्ताहात विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग नोंदविला.या वेळी संस्थाध्यक्ष डॉ.अरुण कुलकर्णी, सचिव डॉ.मिलिंद डहाळे, मुख्याध्यापक प्रा.बी.एन.चौधरी, उपमुख्याध्यापक डॉ.संजीवकुमार सोनवणे, पर्यवेक्षक एस.एम.अमृतकर प्रमुख अतिथी होते.विद्यालयातील राज्य, राष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या खेळाडू अंकित महाजन, कौशल पाटील, अंकित पाटील, जान्हवी पाटील, टीना नायर यांनी क्रीडांगणावर क्रीडा ज्योत आणून सभास्थानी आणली. सई जोशीसह मान्यवरांनी तिचे रोपण करून उद्घाटन केले. यानिमित्ताने सई जोशी हिचा ग्रंथ, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना तिने शालेय जीवनापासून खेळावर लक्ष केंद्रित करायला हवे असा सल्ला दिला. क्रीडांगणावर खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये संघर्ष करण्याची जिद्द, पराभव आणि विजय पचविण्याची क्षमता, सुदृढ शरीर आणि तत्काळ निर्णय घेण्याची तल्लख बुध्दी सहज निर्माण होते, असे ती म्हणाली. विद्यार्थ्यांनी एकच खेळ निवडून त्यात आपले प्रावीण्य सिध्द करावे, असा संदेश तिने दिला.डॉ.अरुण कुलकर्णी यांनी सई जोशीच्या क्रीडा नैपुण्याचे भरभरुन कौतुक केले व विद्यार्थ्यांना खेळभावना जोपासण्याचे आवाहन केले.प्रास्ताविक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी, सूत्रसंचलन रोशनी शिंदे आणि कावेरी पाटील यांनी तर आभार प्रदर्शन क्रीडाशिक्षक एम. डी. परदेशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वाय.ए.पाटील, डी.एच. कोळी, एन.वाय.शिंदे, प्रवीण तिवारी, नितीन बडगुजर, राजेंद्र पवार, वाय.पी. नाईक, मिलिंद हिंगोणेकर, जितेंद्र दाभाडे व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
धरणगावात क्रीडा महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 3:37 PM
विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि खेळ यात समतोल राखला तर त्यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होऊ शकते. म्हणून खेळा , जिंका आणि जीवनात यशस्वी व्हा, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू सई अनिल जोशी यांनी उद्घाटनप्रसंगी केले.
ठळक मुद्देविद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभागविद्यार्थ्यांनी अभ्यास आणि खेळ यात समतोल राखावा- सई जोशी