जळगाव : नूतन मराठा महाविद्यालयातील हॉकीचा खेळाडू तथा विद्यार्थी रामकृष्ण भास्कर पाटील (वय- 22, रा़ वाणेगाव ता़पाचोरा) याचा जलदगतीने शोध घ्यावा, यासाठी त्याच्या नातेवाईकांनी शनिवारी पोलीस अधीक्षक डॉ़जालिंदर सुपेकर व डीवाय.एस.पी. सचिन सांगळे यांना साकडे घातले आह़े त्यानुसार तपासाला गती मिळाली असून केरळात तरूणाची बॅग आढळून आल्याने पथक तरूणाच्या शोधार्थ केरळात जाणार आह़ेशिक्षणासाठी जळगावात वास्तव्यास असलेला रामकृष्ण हा हॉकीचा खेळाडूचा आह़े तो 3 जानेवारी रोजी हॉकीच्या प्रशिक्षण शिबिरासाठी हरियाणातील सोनपत येथे जात होता़ त्याच्यांशी संपर्क होत नव्हता़ नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला असता तो आढळून आला नव्हता़ यानंतर नातेवाईकांनी शहर पोलीस स्टेशन गाठत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती़ तसेच सोनपत येथे जात असलेल्या रामकृष्ण तब्बल दहा दिवसानंतर केरळ राज्यातील पल्लाखाड स्थानकावर बॅग आढळून आल्याने अपहरणाचा संशय व्यक्त केला होता़ त्यानुसार तपासासाठी शहर पोलीस ठाण्याचे बळीराम तायडे हे मुंबईला रवाना झाले असून दोन दिवसांपासून ते मुंबई सह परिसरातील पोलीस ठाण्यांना भेट देवून तरूणाबाबत काही माहिती मिळते का? त्याबाबत चौकशी करत आहेत़नातेवाईकांनी साकडे घातल्यानंतर अधीक्षक सुपेकर यांच्यासह डीवाएसपी सचिन सांगळे या प्रकरणात जातीने लक्ष घातले आह़े याबाबत सांगळे यांनी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर व सहाय्यक पोलीस निरिक्षक जानकर यांना तातडीने बोलवून घेत तपासाबाबत सूचना केल्या आहेत़ केरळ राज्यातील ज्या स्थानकावर तरूणाची बॅग मिळाली होती़ त्या पाश्र्वभूमिवर कर्मचारी केरळात पाठविणार असल्याचे सांगळे यांनी सांगितल़े
हॉकी खेळाडूच्या शोधार्थ पथक केरळात जाणार
By admin | Published: January 23, 2017 1:00 AM