ठळक मुद्देसर्वांधिक कमाई चाळीसगाव आगाराचीजिल्हाभरातील ११ डेपोमधून सोडल्या जादा बसेसआषाढी वारीसाठी एस.टी.ची सुविधा
जळगाव : पंढरीच्या आषाढी वारीसाठी सोडलेल्या जादा बसेसच्या माध्यमातून ५६ लाख, ९७ हजार, २११ रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. सर्वांधिक उत्पन्न ८ लाख, ६६ हजार चाळीसगाव आगाराला मिळाले आहे.एस.टी.महामंडळाच्या जळगाव विभागातर्फे जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, रावेर, मुक्ताईनगर, भुसावळ, यावल, एरंडोल, अमळनेर, चोपडा या ११ डेपोमधून १८ ते २९ जुलै या कालावधीत विविध आगारातून दररोज ५० ते ६० जादा बसेस पंढरपूरसाठी रवाना करण्यात येत होत्या. भाविकांच्या गर्दीनुसार प्रत्येक आगारातून सकाळ, दुपार व सायंकाळ या तीन सत्रात बसेस रवाना करण्यात येत होत्या.वारकऱ्यांच्या सोयीसाठी घरपोच बसेसची सुविधादेखील उपलब्ध करुन दिली होती.