ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 28- आगारातील यांत्रिक विभागातील भुसावळ येथील प्रशिक्षणार्थी महिला कर्मचा:याचा विनयभंग करणा:या आदील अहमद शेख रा़ जळगाव या एस़टी़ वर्कशॉपमधील मेकॅनिकची शिवसेनेच्या महिलांनी बसस्थानक गाठून यथेच्छ धुलाई केली़ अध्र्यातासार्पयत त्याला बदडत महिलांनी संताप व्यक्त केला़ याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात शेख विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आह़ेपिडीत प्रशिक्षणार्थी महिला परिवारासह भुसावळ येथे वास्तव्यास आह़े 22 रोजी त्यांची जळगाव आगारात मॅकेनिक म्हणून नियुक्ती झाली असून तेथील यांत्रिक विभागात प्रशिक्षण सुरु आह़े 25 रोजी पिडीत महिला नेहमीप्रमाणे जळगाव आगारात प्रशिक्षणासाठी आली होती़ याच विभागात आदिल अहमद शेख हा कार्यरत आह़े त्याने दुपारी अडीच वाजेच्या सुमारास स्टार्टर वायर कशी लावायची हे सांगत पिडीतेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल़ेकाका म्हटल्यावरही चाळेपीडितेच्या खांद्यावर हात ठेवत जवळीक साधण्याचा प्रय} करताच तिने शेखला ‘काका असे करु नका’ असे सांगत विरोध केला असता, शेख याने तिला ‘मी तुझा काका दिसतो का?’ असे म्हणत पुन्हा चिमटी काढत अश्लिल चाळे करण्याचा प्रय} केला. महिलेने तीव्र विरोध करताच ‘तुला राग येतो का ते बघत होतो’ असे म्हणत पळ काढला.पीडित दोन दिवसांपासून तणावातशेख याने केलेल्या अश्लिल कृत्याच्या प्रकारानंतर पीडित महिला तणावात होती़ दोन दिवस तिने जेवणही केली नाही़ मात्र शिवसेनेच्या महिलांनी शेख यास चोप दिल्यावर तिला धीर आला़ यावेळी पिडीतेनेही शेखला चपलांनी मारहाण करत प्रचंड संताप व्यक्त केला़ बसस्थानकात आगारातील कर्मचा:याला महिला बदडत असल्याची माहिती शहरात वा:यासारखी पसरली़ पोलीस आले, मात्र बसस्थानकातील कुणीही अधिकारी तेथे आले नाही़ यानंतर शिवसेनेच्या पदाधिका:यांसह महिलांनी स्थानकप्रमुख, आगार व्यवस्थापक तसेच विभाग नियंत्रक खिरवाडकर यांचे कार्यालय गाठले. मात्र एकही अधिकारी कार्यालयात उपस्थित नव्हता़ त्यांच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, कोणत्याच अधिका:याने फोनही उचलला नसल्याचे, मोहन तिवारी यांनी सांगितल़ेआगार व्यवस्थापकांनी केले शेखचे निलंबनविनयभंगाच्या प्रकारानंतर भेदरलेल्या पिडीतीने रडत-रडत डेपो कार्यालयाचे वर्कशॉप पर्यवेक्षक निलेश बेंडकुळे यांच्याकडे आदिल शेख विरोधात लेखी तक्रार दिली होती़ तक्रारीवर कुठलीही कारवाई झाली़ दुस:या दिवशी मंगळवारी व बुधवाही ही कर्मचारी कामावरच होता़ कुठलीही कारवाई न झाल्याने तसेच शिवसेनेच्या महिला पदाधिका:यांनी दखल घेतल्याने पोलीस ठाण्यात शेख विरोधात फिर्याद दिली़ शेख ला बदडल्याच्या घटनेनंतर आगार व्यवस्थापक प्र™ोश बोरसे यांनी शेखला निलंबित केल़ेपिडीतेसह महिलांनी कपडे फाटेर्पयत बदडले.. या घृणास्पद प्रकाराची माहिती मिळताच बुधवारी दुपारी 11 वाजेच्या सुमारास शिवसेनेच्या शोभा चौधरी, छाया पाटील, रंजना अत्तरदे, ज्योती शिवदे तसेच मोहन तिवारी, गजानन मालपुरे यांनी नवीन बसस्थानक गाठल़े बस स्थानकाच्या आवारात शेखला बोलाविल़े तो दिसताच पिडीतेसह चारही महिलांनी त्याला लाथा, बुक्के, चापटा तसेच चपलांनी बेदम चोप दिला़ यानंतर त्याला पुन्हा बसस्थानकातील कार्यालयात नेत त्याठिकाणी पुन्हा यथेच्छ धुलाई केली़ अर्धातास हा गोंधळ सुरूच होता. महिलांच्या रुद्रावतारामुळे बसस्थानकात बघ्यांची एकच गर्दी झाली होती़ पोलिसांनी घेतले ताब्यातमहिला एकास मारहाण करत असल्याची मिळाल्यावर जिल्हापेठचे गुन्हे शोध विभागातील रवी नरवाडे, प्रविण भोसले यांनी बसस्थानक गाठल़े व शेखला मारहाण करणा:या महिलांच्या तावडीतून सुटका करीत पोलीस ठाण्यात आणल़े पिडितेसह शिवसेनेच्या पदाधिका:यांनी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठल़े व आदिल शेख विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला़ शेख याला अटक करुन पोलिसांनी न्यायालयात हजर केल़े न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला़ंसोमवारी पीडितेने लेखी तक्रार केली होती़ या तक्रारीनुसार वर्कशॉपच्या यांत्रिक विभागातील कर्मचारी आदिल शेख याला तात्पुरते निलंबित करण्यात आले आह़े तसेच प्रकाराचा अहवाल तयार करुन विभागीय कार्यालयाला पाठविला होता़ महिला तक्रार निवारण समितीकडून चौकशीपूर्ण होईर्पयत शेखला निलंबित केले असून चौकशीनंतर समितीच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल -प्र™ोश बोरसे, आगार व्यवस्थापक