शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

शालेय आरोग्य तपासणी पथकाच्या फिरस्तीसाठी एसटीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 11:56 PM

प्रतिसाद मिळत नसल्याने अट काढली

ठळक मुद्देअटी केल्या रद्द निविदा प्रक्रिया अजूनही पूर्ण नाही

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 29 -  राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत शालेय विद्याथ्र्याच्या आरोग्य तपासणीसाठी असलेल्या पथकांच्या वाहनांची  निविदा प्रक्रिया अद्यापही पूर्ण न झाल्याने आता या पथकासाठी एसटी बस व खाजगी वाहनांचा आधार घेतला जात आहे. पथकाला या वाहनांनी पाठविण्यासाठी तसेच त्यांचे बिल अदा करण्यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सकांनी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांना पत्र दिले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र सरकारच्यावतीने अंगणवाडी, शाळा, आश्रमशाळांमधील 16 वर्षे वयोगटार्पयतच्या विद्याथ्र्यांच्या आरोग्य तपासणीसाठी राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रम राबविला जातो. यासाठी जळगाव जिल्ह्यात 40 पथके आहेत.  या पथकाला देण्यात येणारे वाहन कंत्राटी पद्धतीवर लावले जातात. त्यानुसार जळगाव   जिल्ह्यात लावण्यात आलेल्या वाहनांचा कंत्राट एप्रिल महिन्यातच संपला.  मात्र निविदा न काढल्यामुळे संबंधित कंत्राटदाराला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. ती मुदतदेखील 31 ऑगस्ट रोजी संपली.  आरोग्य तपासणीचे वाहने थांबल्यानंतर आलेल्या दोन निविदा उघडण्यात आल्या ख:या मात्र त्याही रद्द कराव्या लागल्या. त्यानंतर  लघु निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र यातील प्रति कि.मी.च्या अटीमुळे निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता ही अट काढून टाकली आहे. त्यामुळे अट काढल्यानंतर आता नव्याने निविदा येणार आहे. मात्र ही प्रक्रिया पूर्ण होणे व यशस्वी होईर्पयत या पथकांना त्या त्या स्तरावरून सार्वजनिक वाहने, ज्यामध्ये एसटी बस, रेल्वे यांचा तसेच खाजगी वाहनांचा आधार घेत शालेय आरोग्य तपासणी करण्याविषयी सूचित करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय, कुटीर रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयांना पत्र दिले आहे.  या फिरस्तीचे प्रत्यक्ष खर्चाचे बिल अदा करण्याचे व तपासणी अहवालही सादर करण्याचे सूचित केले आहे.  

निविदांमधील अटीमुळे त्यास प्रतिसाद मिळत नसल्याने अट काढून टाकली आहे. निविदा पूर्ण होईर्पयत एस.टी., खाजगी वाहनांनी पथकाने प्रवास करण्याविषयी कळविण्यात आले आहे. - डॉ.एन.एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक.