सब कुछ पाकर भी, हासिले जिंदगी कुछ भी नही
मैने देखा है कई सिकंदरो को खाली हाथ जाते हुए
अशी कोणती श्रीमंती आहे, जी मिळाल्यानंतर दुसरी कोणती अपेक्षाच शिल्लक राहत नाही किंवा जीवन सहज होऊन जाते. निश्चितच ती श्रीमंती म्हणजे ब्रम्हज्ञान किंवा देवाची जाणकारी.
परमात्मा हा बेअंत आहे. स्थिर आहे जो कणा-कणात आहे. या निरंकार प्रभूला जाणता येतं. किंबहुना मानवी शरिराची प्राप्ती केवळ परामात्म्याच्या ओळखीसाठीच मिळाली आहे. त्यामुळे मानवाचे प्रथम कर्तव्य देवाला जाणणे होय. मुळ अस्तित्वाची जाण करणे म्हणजे मी कोठून आलो. कोणत्या उद्देशासाठी माझा जन्म आहे आणि ज्यावेळी हे नश्वर शरीर नाश होईल, त्यानंतर काय हे रहस्य जोपर्यंत जाणले जात नाही. तोपर्यंत आम्ही एका ईश्वराचे अस्तित्व मान्य करु शकत नाही आणि यामुळेच मानवी जीवनाला धन्यता प्राप्त होते. अवघे विश्वची माझे घर, विश्वबंधूत्व साकार होते.
संकलन : राजकुमार वाणी