शहरं
Join us  
Trending Stories
1
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
2
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
3
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
4
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
5
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
6
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
7
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
8
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला
9
INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड
10
प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला....
11
मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक; डॉक्टरने काय म्हटलं?
12
PAK vs ENG Test : तब्बल ५५६ धावा करुनही पाकिस्तानची 'कसोटी', इंग्लंडचे जोरदार प्रत्युत्तर; रुट-ब्रूकचे शतक
13
हरयाणातील पराभवानंतर उत्तर प्रदेशात सपाचा काँग्रेसला धक्का, केली मोठी घोषणा!
14
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
15
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
16
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
17
सपा, शिवसेना अन् आपचा काँग्रेसला घरचा आहेर; हरयाणातील पराभवानंतर 'INDIA' मध्ये मतभेद
18
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
19
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
20
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल

चोसाका प्रशासनाला रात्री दीड वाजता कामगारांचा करावा लागला पगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 6:41 PM

चोपडा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी शुक्रवारी रात्री मोलॅसीसचे टँकर अडविल्याने प्रशासनाने धावपळ करीत आंदोलन करणाºया कामगारांना पगार वाटप केले.

ठळक मुद्देकामगारांनी ३ टँकर अडवून प्रवेशद्वारासमोर मांडला होता ठिय्या४० ते ४५ कामगारांना केले पगार वाटपआंदोलनस्थळावरून निघून गेलेले मात्र पगारापासून वंचित

लोकमत आॅनलाईनचोपडा, दि.११ : कामगारांचे थकलेले पगार देण्याच्या मागणीसाठी चहार्डी ता. चोपडा येथील साखर कारखान्यातील कामगारांनी १० रोजी मोलॅसिस भरलेले ३ टँकर्स अडविले होते. तसेच कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरू केल्याने अखेर प्रशासनाने रात्री दीड वाजता धावपळ करून कामगारांचे पगार वाटप केले आणि हा तिढा सोडविला.सुमारे ७० ते ८० कामगारांनी शुक्रवारी सायंकाळी कारखान्यातून मोलॅसीस घेऊन जाणारे तीन टँकर अचानक अडविले, तसेच प्रवेशद्वाराजवळ ठिय्या मांडला. त्यामुळे टँकर्स अडकून पडले. दरम्यान, चोसाकाचा आगामी गळीत हंगाम सुरू करण्यावर याचा विपरीत परिणाम होईल म्हणून संचालक मंडळ व प्रशासनाने तात्काळ याची दखल घेऊन रात्री तब्बल १.३० वाजता मोलॅसिसचे टँकर अडवणाºया कामगारांचा पगार केला. रात्री दीड ते अडीच वाजेच्या सुमारास आंदोलनस्थळी हजर असलेल्या ४० ते ४५ कामगारांचे पगार वाटप करण्यात आले. पगारापोटी जवळपास पाच लाख रुपये वाटावे लागले. यासाठी चोसाका संचालक निलेश पाटील व प्रभारी कार्यकारी संचालक आधार चिंतामण पाटील आणि अकाउंटंट अनिल सीताराम पाटील यांनी रातोरात कामगारांचे पगार वाटप करण्यासाठी धावपळ केली.मात्र जे कामगार चोसाकाच्या गेटजवळ ठिय्या मारून बसले होते त्यांनाच पगार देण्यात आला. त्यामुळे जे घरी निघून गेले त्या कर्मचाº्यांना पगार मिळाला नसल्याने ते ११ रोजी दिवसभर चोसाकाच्या कार्यालयात पगार मिळेल या आशेने थांबून होते. 

टॅग्स :ChopdaचोपडाSugar factoryसाखर कारखाने