आॅनलाईन लोकमतपाचोरा,दि.९ : मुद्र्रांक विक्रेत्यांनी विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, जळगाव, जामनेर, धरणगाव व एरंडोल येथे कडकडीत बंद असल्याने नागरिक हैराण झाले असून, कामे ठप्प झाली आहेत.तहसील कचेरी, सबरजिष्टर कचेरी, प्रांत कार्यालय आदी ठिकाणी नागरिक सोमवार पहिला दिवस असल्याने विविध कामांसाठी आले असता स्टॅम्पवेंडर बंद आंदोलनाने कोणतीही कामे न होता परत गेले. शासकीय कार्यालयात शुकशुकाट पहायला मिळाला. नोंदणी कार्यालयात एकही दस्तनोंदणी झाली नाही. तालुक्यातील सर्व मुद्रांक विक्रेते आंदोलनात सहभागी झाल्याने विद्यार्थी, शेतकरी कर्जदार यांचीही कामे न झाल्याने त्यांचा हिरमोड झाला. याबाबत दुय्यम निबंधक एस.यु.राठोड यांनी वरिष्ठांना कळविले. आंदोलनस्थळी विविध राजकीय, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी भेटी दिल्या. पाचोरा मुद्र्रांक विक्रेता संघटनेचे अध्यक्ष गोपीनाथ पाटील, सतीश जोश, श्यामकांत सराफ, मिलिंद जोशी, असीमखान, रामदास पाटील, अशोक तांबोळी, यशवंत दुसाने, अनिल बाविस्कर, सतीश वानखेडे, हमीद खान, अण्णा पाटील, रवींद्र्र पाटील, गणेश पाटील, सचिन दुसाने, शरद सोनार, योगेश संघवी, संदीप ब्राह्मणे, प्रताप राजपूत, देवीदास महाजन, सुनील शिंपी आदी मुद्रांक विक्रेते बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत.
मुद्रांक विक्रेत्यांचे बेमुदत बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 6:14 PM
मुद्र्रांक विक्रेत्यांनी विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, जळगाव, जामनेर, धरणगाव व एरंडोल येथे कडकडीत बंद असल्याने नागरिक हैराण झाले असून, कामे ठप्प झाली आहेत.
ठळक मुद्देआंदोलनस्थळी विविध राजकीय, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी दिल्या भेटीनोंदणी कार्यालयात एकही दस्तनोंदणी झाली नाही.शासकीय कार्यालयात शुकशुकाट