शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

बाहेर फिरणाऱ्यांना भर रस्त्यावर उठबशा आणि दंडुक्याची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 12:23 PM

जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन अतिशय तळमळीने जीवाचे रान करीत असताना नागरिक मात्र, हा विषय हसण्यावर नेत असल्याचे ...

जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन अतिशय तळमळीने जीवाचे रान करीत असताना नागरिक मात्र, हा विषय हसण्यावर नेत असल्याचे चित्र सलग दुसºया दिवशी शहरात बघायला मिळाले. शहरात प्रवेश करणारे मार्ग तसेच मुख्य बाजारपेठेत सांगूनही न ऐकणाऱ्यांवर पोलिसांना दंडुका चालवावा लागला तसेच अनेकांना भर रस्त्यावर उठबशा काढण्याची शिक्षा पोलिसांनी केली. शहरात अनेक ठिकाणी राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.कोरोनामुळे इटली, फ्रान्ससारख्या देशात लॉकडाऊन असतानाही हजारो जणांना कोरोनाची लागण झाली तर शेकडो जणांचा मृत्यू झाला. लॉकडाऊनचे महत्त्वच या देशांना समजले नाही, त्यामुळे आम्ही जी चूक केली, ती भारताने करु नये असे आवाहन परिणाम भोगणाºया देशांकडून केले जात असतानाही जळगावकर मात्र हे आवाहन व सरकारचा आदेश झुगारुन रस्त्यावर उतरत आहे. एकंदरीतच आम्हाला या कोरोनाशी काहीही घेणंदेणं नाही असाच संदेश काही जळगावकरांकडून दिला जात आहे. जे समजदार नागरिक आहेत, त्यांनी घराबाहेर न पडणेच पसंत केले आहे.दिसला की दे दंडुकाप्रशासकीय संचारबंदी आणि त्याशिवाय जमावबंदी आदेश असल्याने शहरात ठोस कारणाशिवाय फिरणाºया तरुणांना पोलिसांनी दंडुक्याने दणका देत पिटाळून लावले. काही ठिकाणी तर वयस्कर नागरिकही रस्त्यावर दिसले, कारण विचारले तर किराणा व भाजी घेण्यासाठी आल्याचे सांगितले जात होते. एकाच वेळी भाजी घेण्यासाठी मोठी गर्दी उसळत होती. दुसरीकडे ज्यांना या आजाराचे गांभीर्य कळले आहे, ते नागरिक जिल्हा रुग्णालयात नातेवाईक उपचार घेत असतानाही फिरकत नाहीत. एरव्ही नेहमीच गर्दीने गजबजणाºया जिल्हा रुग्णालयात मात्र मंगळवारी शुकशुकाट दिसून आला.सकाळी गर्दी तर दुपारी शुकशुकाटगुढीपाडव्याच्या निमित्ताने पिंप्राळा रिक्षा स्टॉप येथे हार-कंगणांची लहान-मोठी दुकाने थाटलेली होती़ त्यामुळे याठिकाणी नागरिकांची खरेदीसाठी चांगलीच गर्दी झालेली होती़ दुसरीकडे गणेश कॉलनी येथेसुध्दा किराणा दुकान, मेडिकलवरही गर्दी होती़ पेट्रोल पंपांवरही कमी प्रमाणात गर्दी होती़या भागात चालला जोरदार दंडुकाटॉवर चौक, घाणेकर चौक, सुभाष चौक, सिंधी कॉलनी, कंवर नगर, डी मार्ट, कालिंका माता मंदिर परिसरात विनाकारण दुचाकीने फिरणाºया तरुणांवर पोलिसांनी चांगलाच दंडूका चालविला.पोलिसांकडून पिटाळून लावले जात असल्याची चर्चा शहरात पसरल्यानंतर दुपारी गर्दी कमी झाली होती, मात्र सायंकाळी सात नंतर पुन्हा नागरिक रस्त्यावर उतरले होते.संचारबंदी झुगारुन येथे तरुणांचा घोळकागणेश कॉलनीतील प्रभुदेसाई कॉलनी, ख्वॉजामिया व युनिटी चेंबर्स येथील दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरु रहात असून या ठिकाणी विशिष्टच लोकांची गर्दी असते. प्रभुदेसाई कॉलनीतील शांतीबन अपार्टमेंट परिसरात अभियांत्रिकी व वैद्यकिय महाविद्यालयाच्याच विद्यार्थ्यांचा घोळका असतो. या ठिकाणी अमलीपदार्थांची विक्री होत असल्याचा संशय या परिसरातील महिलांनी व्यक्त केला आहे. गणेश कॉलनीतही एक स्वीट मार्ट उशिरापर्यंत सुरु होते. ख्वॉजामिया परिसर व युनिटी चेंबर्स येथेही परिस्थिती वेगळी नाही. या विक्रेत्यांकडून संचारबंदी आदेशालाच हरताळ फासली जात आहे.यंत्रणेचा मनस्ताप अन् व्हायरल मेसेजकोरोनामुळे संचारबंदी करण्यात आली व नागरिक ही संचारबंदी पाळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर इटली व इतर देशांमध्ये कोरोनाचे काय परिणाम झाले. तेथील नागरिकांनी काय चुका केल्या याचे प्रबोधनात्मक संदेश व्हायरल होत होते. रेल्वे, विमान व बस सेवा बंद करुन सरकार मोठे नुकसान सहन करीत आहेत. भारतीयांच्या जीवापेक्षा हे नुकसान मोठे नाही म्हणत सरकार लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करीत आहेत. घरात थांबले तरी देशसेवाच होईल, असे आवाहन करीत असतानाही नागरिक घराबाहेर पडतच आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव