तेने मुक्तिचारी साधीयेला |
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ हा दररोजच्या जीवनात म्हणण्यासाठी आहे. या अभंगापासून संत ज्ञानेश्वर म्हणजेच ज्ञानदेव महाराजांचा सत्तावीस अभंगाचा हरिपाठ आहे. हरिपाठ अभंगाचे शेवटचे कडवे ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान | समाधी संजीवन हरिपाठ या पर्यंत म्हटला जातो.
हरीपाठातील देवाचिये द्वारी उभा क्षणभरी, हा पहिलाच अभंग वारकऱ्यांच्या नित्य पाठातील आहे. आकाश गंगेच्या नभांगणातील सत्तावीस नक्षत्रांचा तेज या हरिपाठातील सत्तावीस अभंगाला लाभले आहे. मानवी जीवनातील जो कोणी देवाच्या दारात, क्षणभर का होईना उभा राहील. त्या देवाच्या दारी ओट्यावर बसून देवाचे त्या ईश्वराचे स्मरण करेल, त्याला चारही स्मृती प्राप्त होतील. त्यामध्ये शास्त्रात सांगितल्या प्रमाणे सलोकता , समिप्ता, स्वरुप्ता व सायुजता या चार मुक्ती अशा प्रकारे साधकाला लाभतील .
प्रत्येक मनुष्याने आपल्या मुखातून हरिनामाचा सतत जप करा. यामुळे तुम्हाला जे पुण्य प्राप्त होईल, त्याचे मोजमाप कुणी करू शकणार नाही. आपण सर्वांना संसारात राहून नाम साधना करता येते. जगामध्ये सर्व वेद, सहा शास्त्र,अठरा पुराण या वरून साधनेचे सर्वात सोपे साधन म्हणजे हरिपाठ होय. महर्षी व्यास यांनी पुराण ग्रंथातून हरिनामाचा महिमा भक्तावर असलेले प्रेम या गोष्टीची ओळख करून दिली आहे.
हरिमुखे म्हणा हा भक्तीचा मुख्य विचार केला आहे. हरिपाठात प्रत्येक अभंगांमध्ये वारकरी हे ध्रुवपद म्हणतात. नामस्मरणात तल्लीन व्हावं आणि आपल्या उत्कृष्ट भक्ती भावाने हरीपाठाने श्री हरीला वश प्रसन्न करावे, हाच हरी पाठाचा खरा संदेश आहे. देव म्हणजे प्रकाश, जो प्रकाश मान असतो तो देव आणि देवाचा द्वार हे आत्म विद्येचे प्रकाश द्वार. भगवंताच्या स्व: स्वरुपात विलीन होणे, आपल्याला जमेल तेवढं मन एकरूप करून आपल्या चित्तवृत्तीला श्री हरी चरणाला लावाव्या आणि नाम स्मरणात दंग होऊन जावं हाच या अभंगाचा हरिपाठ संदेश आहे.
निरुपण : हभप गोपाळ ढाके महाराज