आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १७ - भाजपाच्या स्थापनादिनी, ६ एप्रिल रोजी मुंबई येथे महामेळावा होणार असून त्यामध्ये खान्देशातील जास्तीत जास्त पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपाचे प्रदेश सरचिटणीस रामदास आंबटकर यांनी जळगावात भाजपाच्या विभागीय बैठकीत केले.शनिवारी जळगाव येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या वेळी आंबटकर यांच्यासह जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, ए.टी. पाटील, आमदार सुरेश भोळे, स्मिता वाघ, हरिभाऊ जावळे, संजय सावकारे आदी उपस्थित आहे.खान्देश विभागीय या बैठकीत महामेळाव्याचे नियोजन करण्यात आले. या वेळी खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित आहे.
जळगावात भाजपा विभागीय बैठकीस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 1:43 PM