यावेळी महापौरांनी अमृत योजना आणि भूमीगत गटारींच्या चाऱ्या बुजविल्यानंतर शिल्लक असलेली बारीक खडी तात्काळ उचलण्यासाठी मनपाचे मनुष्यबळ वापरून काम करावे. सोमवारपासून एकही परिसरातून तक्रार येणार नाही, याची काळजी घेण्याचे सांगितले. यावेळी गोलाणी मार्केटच्या तळघरातील साचलेल्या पाण्याबाबत तात्काळ उपाययोजना करण्याच्या सुचनाही दिल्या. यावेळी शहरात प्रत्येक प्रभागातील खड्डे बुजविण्यासाठी मनपाने मक्ता दिलेला आहे. काही प्रभागात अद्यापही काम सुरू न झाल्याने ओरड सुरू आहे. कामाचा दर्जा तपासण्यासाठी अचानक पाहणी करणार असल्याचेही महापौरांनी सांगितले.
इन्फो :
भूमीगत गटारींच्या चेंबरची तपासणी करणार :
शहरात मुख्य ९ हजार पैकी ४ हजार चेंबर पूर्ण झाले असून, त्या ठिकाणी चेंबरची धारण क्षमता तपासणीसाठी लोड टेस्ट करण्यात येणार असल्याची मक्तेदार प्रतिनिधीने दिली. २५ जानेवारीपासून मशीनद्वारे दररोज ५ याप्रमाणे १० दिवसात वेगवेगळ्या प्रभागातील ५० चेंबरची तपासणी करण्यात येणार आहे.