जळगाव : जळगाव शहर ते विद्यापीठ बससेवा तत्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांकडून होत आहे. याबाबत बुधवारी राष्ट्रीय परिवहन मंडळाचे आगार व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले आहे.
नववी ते बारावीचे वर्ग डिसेंबर महिन्यांपासून सुरू झालेले आहेत. शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात बहुतांश विद्यार्थी इयत्ता बारावीत शिक्षण घेत आहेत. त्यामुळे जळगाव शहर ते बांभोरीपर्यंत खासगी वाहनातून विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. अपघातांची मालिकाही आता पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे तत्काळ विद्यापीठ बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. निवेदनावर गोविंद पाडवी, जयसिंग वसावे, सचिन पावरा, विजय पावरा, बालाजी पावरा, पिंटू पावरा, शैलेश वसावे, राकेश वसावे, हिरालाल पावरा, आदी विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.